यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली. भारतानं साखळीफेरीचे दोन सामने न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले. या दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवला. आज (12 मे) रोजी भारत विरुद्ध अमेरिका सामना नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. या सामन्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) पाकिस्तानच्या फलंदाजांना चारीमुंड्या चित केलं आणि भारताला विजय विजय मिळवून दिला. परंतु भारताचे माजी कर्णधार कपिल देव (kapil Dev) यांनी सामन्याच्या सुरुवातीला पहिली ओव्हर का देत नाही? म्हणून प्रश्न उपस्थित केले आहेत.
भारताचे माजी दिग्गज खेळाडू कपिल देव यांचं म्हणणे आहे की, काही फरक पडत नाही परिस्थिती कशी आहे. बुमराहनं भारताकडून पहिली ओव्हर करणं आवश्यक आहे. बुमराह पहिल्या ओव्हरमध्ये नवीन चेंडूनं फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून देणार नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बुमराहला दोन ओव्हर झाल्यानंतर संधी देतो.
कपिल देव (Kapil Dev) एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले, “जेव्हा मी सामना पाहायला जाईल, त्यावेळी मी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) हा प्रश्न विचारेन की तुमच्या योजना काय आहेत? आपण बाहेरुन अंदाज लावू शकतो, पण मी जेवढं क्रिकेट खेळलो आहे, त्यामुळे मला वाटतं आहे की, बुमराहला पहिलीच ओव्हर गोलंदाजीसाठी दिली पाहिजे. तो तुमचा महत्वाचा विकेट घेणारा गोलंदाज आहे. तुम्ही त्याला पाचवी किंवा सहावी ओव्हर देता, यामुळे तुम्ही सामना गमावू शकता.”
कपिल देव यांनी भारतासाठी 131 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी गोलंदाजी करताना 434 विकेट्स घेतल्या आहेत. तर फलंदाजी करताना त्यांनी 31.05च्या सरासरीनं 5248 धावा ठोकल्या आहेत. कपिल देव यांनी भारतासाठी 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 253 विकेट्स घेतल्या आहेत. 225 एकदिवसीय सामन्यात त्यांनी फलंदाजीमार्फत 3783 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्यांची सर्वोच्च धावसंख्या 175 नाबाद राहिली आहे. त्यांच्या कर्णधारपदात भारतानं 1983चा विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंत भारताचा दुसरा युवराज सिंग? कपिल देव यांनी दिली खळबळजनक प्रतिक्रिया!
कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ चमकला, रचला इतिहास!
अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं ICC रँकिंगमध्ये रचला इतिहास! हार्दिक पांड्यालाही फायदा, शाकीब अल हसनचं नुकसान