यंदाचा टी20 विश्वचषक खूप (T20 World Cup) रोमांचक पाहायला मिळत आहे. तत्तूर्वी प्रत्येक विश्वचषकात भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) हा सामना अटीतटीचा पाहायला मिळतो. परंतु यंदाच्या टी20 विश्वचषकात पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाच्या अपेक्षा नसलेल्या अमेरिका संघानं त्यांचा लज्जास्पद पराभव केला. तर भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात आयर्लंड संघाचा पराभव करुन टी20 विश्वचषकात विजयानं सुरुवात केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना (9 जून) रोजी न्यूयाॅर्कमध्ये असलेल्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना खूप अटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे खूप महत्वाचे आहे. कारण यजमान अमेरिका संघानं 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर भारतीय संघानं पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे.
न्यूयाॅर्कच्या नासाउ क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीनुसार भारत संघात काही बदल करु शकतो. कारण या खेळपट्टीवर चेंडू अचानक उसळत आहे. त्यामुळे अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) भारत संघात स्थान देऊ शकतो. भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) जोशुआ लिटलचा (Joshua Little) चेंडू उसळून जोरदार लागला होता. त्यामुळे रोहित रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला होता. रोहित पाकिस्तानविरुद्ध सामन्यात फिट असणार की नाही? याकडंदेखील चाहत्यांचं लक्ष्य वेधलं आहे.
सध्या चर्चा सुरु आहेत की, आयसीसी (ICC) न्यूयाॅर्कमधील खेळपट्टी चांगली करण्याच्या तयारीत आहे. जर खेळपट्टी गोलंदाजांसोबत फलंदाजांनाही साथ द्यायला लागली तर फिरकीपटूच्या भूमिकेत कुलदीप यादव भारतीय संघात पुनरागमन करु शकतो. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) त्याच्या फिरकी गोलंदाजीनं पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणी निर्माण कर शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबर आझमच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद!
पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार मोनांक पटेलनं दिली प्रतिक्रिया
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 5 सर्वात मोठे अपसेट, अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही समावेश