आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आज (5 जून) रोजी भारत विरुद्ध आयर्लंड हा सामना खेळला जाणार आहे. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजावर (Ravindra Jadeja) वक्तव्य केलं आहे.
आकाश चोप्रा म्हणाला, “भारतीय संघाची सर्वात मोेठी अडचण अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आहे. जडेजाला फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे बजावता आली नाही. कारण तो अटतटीचा सामना चांगल्या प्रकारे संपवू शकत नाही. परंतु आपण स्वीकारलं नाही की, तो एक चांगला फिनिशर नाही किंवा समस्या आहे.”
जडेजा बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात 6 चेंडूत केवळ 4 धावाच करु शकला. यादरम्यानं तो चौकार, षटकार मारण्यात अयशस्वी राहिला. त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या थोडी कमी झाली. जडेजानं जर फटकेबाजी केली असती तर भारतीय संघाची धावसंख्येला अजून चांगली गती मिळू शकली असती. आयपीएल 2024च्या हंगामात जडेजानं चेन्नईकडून खेळताना 14 सामन्यात 44.50च्या सरासरीनं 267 धावा ठोकल्या होेत्या. ज्यामध्ये एका अर्धशतकाचा सामावेश आहे.
जडेजा 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यांमध्ये त्यानं 125च्या स्ट्राईक रेटसह 480 धावा केल्या आहेत. यादरम्यानं त्याची सर्वाधिक धावसंख्या 46 राहिली आहे. आकाश चोप्रा म्हणाला, “भारतासाठी अजून एक चिंतेचा विषय म्हणजे शिवम दुबेचा फार्म आहे जो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चांगला राहिला नाही. तर चांगली गोष्ट ही आहे की, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव हे खेळाडू चांगल्या फाॅर्ममध्ये आहेत. परंतु भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण खराब आहे. त्यामुळे ते भारतीय संघाला जास्त अडचणीत आणू शकतं.”
अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
6 चेंडूत 6 षटकार, मिचेल स्टार्कची कारकीर्द उद्ध्वस्त करण्यावर अडला होता युवा भारतीय खेळाडू
डेविड वाॅर्नरच्या निवृत्तीवर रिकी पाँटिंगनं दिली प्रतिक्रिया
टी20 विश्वचषकासाठी जय शहांची टीम इंडियासाठी खास संदेश, रोहित शर्माकडे केली ही मागणी