भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (29 जून) टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या विजेत्यावर पैशांचा वर्षाव होणार असून उपविजेता संघ देखील मालामाल होणार आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला टी20 विश्वचषकाच्या विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मिळणाऱ्या एकूण बक्षिस रकमेबद्दल सांगणार आहोत.
टी20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आयसीसीनं या स्पर्धेसाठी एकूण 11.25 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे 93.5 कोटी रुपये एवढी आहे. 2022 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या तुलनेत बक्षिसाची रक्कम जवळपास दुप्पट आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकाची बक्षीस रक्कम सुमारे 46.6 कोटी रुपये होती. त्यापैकी सुमारे 13.3 कोटी रुपये विजेता संघ इंग्लंडला देण्यात आले होते.
2024 टी20 विश्वचषकाच्या विजेत्या संघाला 20.4 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. तर उपविजेत्या संघाला त्याच्या अर्धे म्हणजे 10.6 कोटी रुपये दिले जातील. उपांत्य फेरीत पराभूत होणारे संघही श्रीमंत होणार असून त्यांना प्रत्येकी 6.5 कोटी रुपये मिळणार आहेत.
4 उपांत्य फेरीतील संघांव्यतिरिक्त, सुपर-8 टप्प्याच्या पुढे जाऊ न शकलेल्या 4 संघांना देखील भरपूर पैसे मिळणार आहेत. सुपर-8 च्या पुढे न जाणाऱ्या प्रत्येक संघाला अंदाजे 3.19 कोटी रुपये मिळतील. साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या 12 संघांनाही बक्षिसाची रक्कम वाटून दिली जाणार आहे.
ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रत्येक संघाला 2.5 कोटी रुपये मिळतील. गुणांच्या आधारे 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये दिले जातील. तसेच प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 26 लाख रुपये मिळतील. टी20 विश्वचषक 2024 मध्ये एक सामना जिंकण्यासाठी स्वतंत्रपणे 26 लाख रुपये दिले जातील. उदाहरणार्थ, एखाद्या संघाला स्पर्धेत फक्त एकच विजय नोंदवता आला, तर त्याला स्वतंत्रपणे 26 लाख रुपये मिळतील. तर 2 सामने जिंकणाऱ्या संघाला 52 लाख रुपयांची रक्कम वेगळी दिली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
शिवम दुबेचा पत्ता कट? टीम इंडिया बदलणार सलामी जोडी, पाहा फायनलमध्ये भारताची संभाव्य प्लेइंग 11
हेड कोच म्हणून राहुल द्रविडचा शेवटचा सामना, ट्राॅफी जिंकून रोहित सेना देणार फेअरवेल गिफ्ट?
IND vs RSA: चाहत्यांसाठी डोकेदुखी! आयसीसी फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड खूपच खराब