आयसीसी टी20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) (2 जून) रोजी शुभारंभ झाला आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिला सामना गुरुवारी (6 जून) रोजी खेळणार आहे. हा टी20 विश्वचषक संपल्यानंतर ऑस्ट्रलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वाॅर्नर (David Warner) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल. तत्पूर्वी माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) वाॅर्नरला विजेता ठरवत म्हणाला, “या 37 वर्षीय खेळाडूनं निवृत्ती घेतल्यानंतर त्यालाच नाही तर त्यानं केलेल्या सर्व विक्रमांना स्मरणात ठेवलं जाईल.”
डेविड वाॅर्नरनं (David Warner) एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकापूर्वीच वाॅर्नरनं सांगितले आहे की, 2024चा टी20 विश्वचषक हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट असेल. डेविड वाॅर्नरनं शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 2023च्या विश्वचषकात भारताविरुद्ध खेळला. तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीचा शेवट पाकिस्तानविरुद्ध झाला. त्यामध्ये त्यानं 1 शतकासह 1 अर्धशतक झळकावलं.
रिकी पाँटिंग म्हणाला, “डेविड वाॅर्नर (David Warner) एक असा खेळाडू आहे, ज्याला तुम्ही तुमच्या संघात राखून ठेवालं. विश्वचषकाच्या सामन्यात तुम्हाला त्याच्यासारख्या खेळाडूची गरज आहे. तो एक विजेता खेळाडू आहे. तो सर्वकाही करतो पण जिंकण्याची जिद्द ठेवतो. तुम्ही सामन्यादरम्यान त्याची खेळण्याची शैली पाहू शकता. त्यामुळे वाॅर्नर गेल्यानंतर आपण धावांपेक्षा बरच काही गमावून बसणार आहोत. परंतु आशा आहे की, ऑस्ट्रेलिया संघात असा कोणीतरी खेळाडू येईल, जो त्याची कमी भासून देणार नाही.
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- डेविड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल मार्श (कर्णधार), टिम डेविड, कॅमरन ग्रीन, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन एगर, पॅट कमिन्स, नाथन एलिस, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी जय शहांची टीम इंडियासाठी खास संदेश, रोहित शर्माकडे केली ही मागणी
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रोहित शर्मानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आयर्लंडविरुद्धचा सामना…”
जगभरात किंग कोहलीचीच हवा! सुपरस्टार नेयमारलाही टाकले मागे