19 जूनपासून टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 सामन्यांना सुरुवात होणार आहेत. साखळी फेरीतील टॉप 8 संघ सुपर 8 साठी पात्र ठरले आहेत. सुपर 8 च्या गट 1 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश हे 4 संघ आहेत. तर गट 2 मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडीज हे संघ आहेत. गट-1 आणि गट-2 मधील टॉप 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
20 जून रोजी बार्बाडोस येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-8 सामना होणार आहे. यानंतर 22 जून रोजी अँटिग्वा येथील सर व्हिव्ह रिचर्ड्स स्टेडियमवर भारताचा सामना बांग्लादेशशी होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 24 जून रोजी सेंट लुसिया येथे सुपर-8 चा तिसरा सामना होणार आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्रुप 1 मध्ये टॉप 2 मध्ये राहावं लागेल.
गट-2 मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या तुल्यबळ संघांचा समावेश आहे. गट-2 मध्ये 19 जून रोजी अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि 20 जून रोजी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे. 21 जून रोजी इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि 22 जून रोजी अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे. तर 23 जूनला अमेरिका विरुद्ध इंग्लंड आणि 24 जूनला वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.
सुपर-8 मध्ये भारताचं वेळापत्रक
(1) भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 20 जून, रात्री 8.00 वाजता, बार्बाडोस
(2) भारत विरुद्ध बांग्लादेश – 22 जून, रात्री 8.00 वाजता, अँटिग्वा
(3) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 24 जून, रात्री 8.00, सेंट लुसिया
सुपर 8 चे ग्रुप
गट-1: भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान
गट-2: अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका
सुपर 8 सामन्यांचं वेळापत्रक
19 जून – अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, रात्री 8 वा
20 जून – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट लुसिया, सकाळी 6 वा
20 जून – अफगाणिस्तान विरुद्ध भारत, बार्बाडोस, रात्री 8 वा
21 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लदेश, अँटिग्वा, सकाळी 6 वा
21 जून – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट लुसिया, रात्री 8 वा
22 जून – अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडीज, बार्बाडोस, सकाळी 6 वाजता
22 जून- भारत विरुद्ध बांग्लादेश, अँटिग्वा, रात्री 8 वा
23 जून – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वाजता
23 जून – अमेरिका विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस, रात्री 8 वा
24 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, सकाळी 6 वा
24 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सेंट लुसिया, रात्री 8 वा
25 जून – अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वाजता
27 जून – उपांत्य फेरी 1, गयाना, सकाळी 6 वाजता
27 जून – उपांत्य फेरी 2, त्रिनिदाद, रात्री 8
29 जून – अंतिम सामना, बार्बाडोस, रात्री 8 वा
(सर्व सामन्यांच्या वेळा भारतीय वेळेनुसार आहेत)