यंदाच्या टी20 विश्वचकातील 11वा सामना (6 जून) रोजी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात यजमान अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हर मध्ये धूळ चारली. पाकिस्तान संघाची धुरा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) हाती होती तर अमेरिका संघाला मोनांक पटेल (Monank Patel) सांभाळत होता. या अटीतटीच्या सामन्यात अमेरिकेनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर कर्णधार पटेलनं विजयाबद्दल वक्तव्य केलं.
अमेरिकेनं टाॅस जिंकून पाकिस्तानला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. त्याबदल्यात पाकिस्ताननं मर्यादित 20 षटकात 7 गडी गमावून 159 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमनं 43 चेंडूत 44 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 3 चौकारांसह 2 षटकार ठोकले. तर अष्टपैलू खेळाडू शादाब खान यानं 25 चेंडूत 40 धावांची खेळी खेळत संघाला 159 धावांपर्यंत पोहचवलं.
अमेरिकेनं मिळालेल्या 160 धावांचा पाठलाग करताना कर्णधार मोनांक पटेलनं 38 चेंडूत 50 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली यामध्ये त्यानं 7 चौकारांसह 1 उत्तुंग षटकार ठोकलां त्यानंतर तो अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमिरच्या चेंडूवर बाद झाला. शेवटी सामना आरोेन जाॅन्स आणि नितीश कुमार यांनी बरोबरीवर आणून ठेवला आणि पाकिस्तानविरुद्ध अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये 18 धावा ठोकल्या. परंतु पाकिस्तानला सुपरओव्हरमध्ये गोलंदाजी करताना सौरभ नेत्रावळकरनं घवघवीत यश मिळवतं अमेरिकेला सामना जिंकवून दिला.
सामना झाल्यानंतर अमेरिका कर्णधार मोनांक पटेलला (Monank Patal) सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. मोनांक पटेल म्हणाला, “आम्ही पाकिस्तानला पावरप्लेमध्ये जास्त धावा करुन दिल्या नाहीत आणि त्यांना दबावात टाकले. त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली. आमचं लक्ष्य होतं की टाॅस जिंकला की प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडायचा. आम्हाला माहित होतं की, पहिल्या अर्ध्यातासात वेगवान गोलंदाजांना नक्कीच मदत मिळणार आणि या मैदानावर 160 धावांच आव्हान आरामात गाठलं जाऊ शकतं.”
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पराभवानंतर टीम इंडिया सावध! रोहित सेना चुकूनही करणार नाही ‘या’ चार गोष्टी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफवर बॉल टेम्परिंगचे आरोप, आयसीसी दखल घेणार का?
पाकिस्तानसह कर्णधार बाबर आझम सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल!