आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरूष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंकेला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. यातील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. याआधी आपण कोणता संघ या स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला हे जाणून घेऊ.
या स्पर्धेच्या इतिहासात दोन संघ असे आहेत जे ५० पेक्षा कमी धावसंख्येवर गारद झाले आहेत. हे दोन्ही संघ एकदाच नाहीतर दोनदा टी२० विश्वचषकात ५० धावसंख्येच्या आतच सर्व विकेट्स गमावून बसले. टी२० विश्वचषकातील सर्वात कमी पाच धावसंख्येबाबत माहित करून घेऊ.
२००७पासून सुरू झालेल्या या विश्वचषकाला १९ वर्षांचा इतिहास आहे. २०१४पर्यत या स्पर्धेत एकही संघ ५० धावसंख्येच्या आत परतला नाही, मात्र २०१४मध्ये नेदरलॅंड्स श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा करतच सर्वबाद झाला होता. त्यानंतर चार वेळा संघ ५० धावसंख्येच्या आत सर्वबाद झाले आहेत. नेदरलॅंड्सने २०२१च्या विश्वचषकातही ५० पेक्षा कमी धावसंख्या केली होती.
या यादीत युंगाडाचा संघ वरच्या स्थानावर आहे. त्यांनी २०२४मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३९ धावासंख्या केली होती. त्याच आवृत्तीत पुन्हा एकदा त्यांनी ही कामगिरी केली. युगांडा न्यूझीलंड विरुद्ध ४० धावसंख्येवरच निपटली. त्यामुळे युंगाडा हा एकमेव संघ ठरला जे ४० पेक्षा कमी धावसंख्या करत दोनदा सर्वबाद झाले. या यादीत चौथ्या क्रमांकावर नेदरलॅड्स आहे. त्यांनी २०२१च्या आवृत्तीत श्रीलंकेविरुद्ध ४४ धावसंख्या करताना सर्व विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर ओमान संघ आहे. ते २०२४च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ४७ धावसंख्येवरच सर्वबाद झाले होते.
सध्याच्या म्हणजे २०२६च्या आवृत्तीत एकूण २० संघ खेळणार आहेत. त्यामुळे टी२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एवढे संघ एकाच आवृत्तीत खेळताना दिसतील.
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या
३९ – युगांडा वि. वेस्ट इंडिज
३९ – नेदरलॅंड्स वि. श्रीलंका
४०- युगांडा वि. न्यूझीलंड
४४ – नेदरलॅंड्स वि. श्रीलंका
४७ – ओमान वि.इंग्लंड





