आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यासोबत चर्चा करत अडचणी दूर केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून हे दोन्ही क्रिकेट बोर्ड चांगलेच चर्चेत आले होते. त्यात बांग्लादेशने भारतात सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२६मध्ये खेळण्यास नकार दिल्याने आयसीसी त्यांच्यावर कडक कारवाई करेल असे वाटत असताना चकित करणारे विधान समोर येत आहे.
बांग्लादेश हा आयसीसीचा पूर्ण सदस्य असलेला संघ आहे. तसेच जागतिक पातळीवर क्रिकेटमध्ये त्यांचीही भुमिका महत्वपूर्ण ठरली आहे. देशाचे २०० मिलियनपेक्षा अधिक चाहते असून आशिया खंडातील महत्वाच्या संघांपैकी एक आहे. यामुळे त्यांनी एखाद्या आयसीसी स्पर्धेत सहभाग घेतला नाही, तर याचा मोठा परिणाम होणार नाही. असे आयसीसीच्या भुमिकवरून स्पष्ट होत आहे.
आयसीसीने नुकत्याच घेतलेल्या चर्चासत्रात महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये बांग्लादेशवर कोणतेही आर्थिक निर्बंध लादले जाणार नाही. त्यांना विवाद समाधान समिती (Dispute Resolution Committee) यांच्याशी संपर्क करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आयसीसीच्या नियमामध्ये येतो. त्यांना दंड देण्याऐवजी त्यातून काय मार्ग काढला जाईल, याचा विचार केला गेला.
बांग्लादेशसाठी आयसीसीने आणखी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी बांग्लादेश २०२८-२०३१ दरम्यान कोणत्याही एका आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवू शकतो. ही स्पर्धा २०३१च्या पुरूष वनडे विश्वचषकाआधीची असेल.
आयसीसीने हा निर्णय रविवारी पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी, बीसीबीचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल आणि आयसीसीचे उपाध्यक्ष इमरान ख्वाजा यांच्यात झालेल्या भेटीनंतर घेतला आहे.
या भेटीनंतर टी२० विश्वचषकातील १५ फेब्रुवारीला होणारा पाकिस्तान विरुद्ध भारत ठरल्याप्रमाणे खेळला जाणार आहे. बांग्लादेशच्या या स्पर्धेतील माघारीनंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर अनेक बोर्डांनी पाकिस्तानच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. आता सर्व काही व्यवस्थित असल्याने चाहत्यांना हा हाय-व्होल्टेज सामना पाहता येणार आहे.
हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत असून पाकिस्तानने नेतृत्व सलमान आगा करत आहे. सध्या दोन्ही संघांनी यामधील त्यांचा एक-एक सामना जिंकत स्पर्धेचा विजयी प्रारंभ केला आहे.






