---Advertisement---

भारत-नामीबिया टी20 वर्ल्ड कप 2026 सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 6:31 PM
---Advertisement---

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये अमेरिकेला नमवून शानदार सुरुवात करणारा भारतीय संघ आता गुरुवारी, 12 फेब्रुवारी रोजी नामीबियाविरुद्ध (India vs Namibia) आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील टीम इंडिया नामीबियाला हरवून आपली विजयाची लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. मात्र, भारतीय संघ नामीबियाला अजिबात हलक्यात घेणार नाही.

पहिल्या सामन्यात नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला असला, तरी नामीबियाने जोरदार झुंज दिली होती. त्यामुळे नामीबियाचा संघ आपल्या चुकांमधून धडा घेऊन पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल. अशा परिस्थितीत हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

सामना गुरुवार, 12 फेब्रुवारी 2026 रोजी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. ही लढत अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. तर भारतीय चाहते हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स (Star Sports) च्या विविध चॅनेल्सवर थेट पाहू शकतात. या सामन्याचे ऑनलाईन स्ट्रीमिंग जियोहॉटस्टार (JioHotstar) ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---