---Advertisement---

World Cup 2026: पाकिस्तानचा संघ जाहीर, पण खेळण्याबाबत अनिश्चितता! ‘बहिष्काराची’ टांगती तलवार कायम

On: रविवार, जानेवारी 25, 2026 7:00 PM
---Advertisement---

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे (ICC T20 international world cup 2026). श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सलमान अली आगाकडे (Salman Ali Aaga Under Captaincy) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र, संघ जाहीर झाला असला तरी पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

आयपीएल 2026 मधून मुस्तफिजुर रहमान (Mustafijur Rehman) बाहेर पडल्यानंतर, बांगलादेशने भारतात येऊन विश्वचषक खेळण्यास नकार दिला होता. त्यांनी आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. परिणामी, बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्ताननेही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले होते.

लाहोरमध्ये झालेल्या बैठकीनंतर निवडकर्ते आकिब जावेद यांनी स्पष्ट केले की, आमचे काम संघ निवडणे आहे आणि आम्ही ते केले आहे. परंतु, संघ विश्वचषकासाठी जाणार की नाही, याचा अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनीही सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संघ जाहीर करूनही पाकिस्तान शेवटच्या क्षणी ‘यू-टर्न’ घेऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---