---Advertisement---

T20WC2026: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट; जाणून घ्या कोलंबोचा हवामान अंदाज!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 20, 2026 10:29 PM
---Advertisement---

टी-20 (icc T20 international world cup 2026) वर्ल्ड कपमध्ये शनिवारी, 21 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर-8 चा थरार रंगणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होईल. मात्र, या महत्त्वाच्या लढतीवर पावसाचे सावट आहे. कोलंबोमध्ये सामन्याच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्यानुसार, सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता सुमारे 75 टक्के आहे. म्हणजेच कमाल तापमान 30 आणि किमान 24°C राहण्याचा अंदाज आहे. आकाशात ढग दाटून येतील आणि आर्द्रतेचे (Humidity) प्रमाण 87 टक्क्यांपर्यंत असू शकते. जरी पावसाची शक्यता जास्त असली, तरी चाहत्यांना आशा आहे की प्रत्यक्ष सामन्याच्या वेळी पाऊस विश्रांती घेईल.

सुपर-8 फेरीत साखळी सामन्यांप्रमाणेच कोणताही राखीव दिवस (Reserve Day) नाही. त्यामुळे जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण वाटून दिला जाईल. असे झाल्यास, उपांत्य फेरीच्या (Semifinal) शर्यतीत टिकण्यासाठी दोन्ही संघांना उरलेले दोन सामने जिंकणे अत्यंत गरजेचे होईल.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांना इंग्लंड आणि श्रीलंकेसोबत ‘ग्रुप-2’ मध्ये ठेवण्यात आले आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीत 4 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले आहेत. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---