---Advertisement---

धक्कादायक! ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनणार हे निश्चित? नेमकं काय आहे यामागचं गुपित

On: सोमवार, फेब्रुवारी 2, 2026 7:01 PM
pba8uk5g_australia-afp_625x300_06_September_24
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका India and Shrilanka यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ (t20 world cup 2026) मध्ये ऑस्ट्रेलिया संघ विजेता ठरू शकतो. कांगारू टीम दुसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या असे काही योगायोग जुळून आले आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला रोखणे कठीण जाईल असे मानले जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत गेल्या 19 वर्षांपासून एक विचित्र पण यशस्वी पॅटर्न पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा हा संघ वर्ल्ड कपपूर्वी एखादी मालिका हरतो, तेव्हा तेव्हा त्यांनी वर्ल्ड कप जिंकला आहे. 2007 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मालिका हरले, पण विश्वविजेते बनले. 2021 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मालिका गमावली, पण ट्रॉफी जिंकली.

2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मालिकेतील पराभवानंतर भारताला हरवून चॅम्पियन बनले. 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी वनडे मालिका हरले, तरीही वर्ल्ड कप आपल्याच नावे केला.

आता 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीही ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात 208 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ केवळ 96 धावांत गारद झाला.

इतिहास पाहता, वर्ल्ड कपपूर्वी मालिका गमावणे हे ऑस्ट्रेलियासाठी ‘लकी’ ठरत आले आहे. जर हाच योगायोग पुन्हा खरा ठरला, तर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---