---Advertisement---

AUSTRALIA vs IRELAND: झॅम्पा आणि एलिसच्या गोलंदाजीचा धडाका; ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर मोठा विजय

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 7:57 PM
pba8uk5g_australia-afp_625x300_06_September_24
---Advertisement---

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये ऑस्ट्रेलियाने दिमाखदार विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. ट्रेविस हेडच्या (Travis Head) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा 67 धावांनी पराभव केला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 16.5 षटकांमध्ये केवळ 115 धावांवर गारद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे खरे हिरो ॲडम झॅम्पा (Addam Zampa & Nathan Ellis) आणि नॅथन एलिस ठरले; दोघांनीही प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत आयर्लंडचे कंबरडे मोडले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार ट्रेविस हेडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हेड स्वतः अवघ्या 6 धावा काढून रन आऊट झाला. त्यानंतर जोश इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी डावाची धुरा सांभाळली आणि पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा जमवल्या. ग्रीनने 21 धावा केल्या, तर इंग्लिसने 37 धावांची आक्रमक खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मॅट रेनशॉ (37 धावा) आणि मार्कस स्टॉइनिस (45 धावा) यांच्या उपयुक्त खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने 182 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. आयर्लंडकडून मार्क अडायरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. कर्णधार पॉल स्टर्लिंगला ‘हॅमस्ट्रिंग’च्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. या धक्क्यातून आयर्लंडचा संघ सावरूच शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना एकतर्फी जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---