---Advertisement---

AFG v NZ : ‘निकाल काहीही येवो..’ अमिताभ यांच्या ट्विटमुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या विचारांत बदल

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 9:19 AM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा हंगाम अंतिम टप्पात आला आहे. सुपर १२ फेरीतील अवघे ३ सामने शिल्लक असून या सामन्यांच्या निकालावर विश्वचषकाचा उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरणार आहे. आतापर्यंत गट १ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर गट २ मधून पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे. मात्र दुसऱ्या स्थानासाठी न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान संघ शर्यतीत आहेत.

सुरुवातीच्या २ सामन्यात प्रतिस्पर्ध्यांपुढे गुडघे टेकणाऱ्या भारताने पुढील २ सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. परंतु स्पर्धेतील त्यांचे भवितव्य रविवार रोजी (०७ नोव्हेंबर) होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावरुन निर्भर असणार आहे. या सामन्यापूर्वी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत समस्त भारतीय रहिवास्यांना अनमोल संदेश दिला आहे.

“टी ४०८८- उद्या आयसीसी टी२० विश्वचषकात होणाऱ्या न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान सामन्याच्या निकालाची पर्वा न करता.. हे आठवण ठेवा की, आपण (भारतीय संघ) टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे; केएल राहुलने स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे; आणि आपण विरोधी संघाला विक्रमी ६.३ षटकांमध्ये पराभूत केले आहे,” असे अमिताभ यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे. 

https://twitter.com/SrBachchan/status/1457062646365126665?s=20

थोडक्यात अमिताभ यांनी भारतवासींना भारतीय संघातील खेळाडूंच्या टी२० विश्वचषकातील प्रदर्शनाचा विसर न पडू देता त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा उपदेश दिला आहे. कारण यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीसहित संपूर्ण संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यातही मोहम्मद शमीला तर अनेकांनी धर्मावरुन टीका केली होती.

आता अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात अफगाणिस्तानने बाजी मारल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा आहेत. परंतु जर याउलट निकाल लागल्यास भारतीय संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान तिथेच संपेल. अशात पुन्हा भारतीय खेळाडूंवर टिकेची झोड उठू शकते. याच धर्तीवर अमिताभ यांनी सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या विचारात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कागिसो रबाडाने रचला इतिहास, इंग्लंडविरुद्ध २०व्या षटकात घेतली ‘हॅट्रिक’, विक्रमांची घातली रास

‘हॅट्रिकवीर’ रबाडाची लिविंगस्टोनने केली धुलाई, सलग ३ षटकार ठोकताना मारला टूर्नामेंटमधील सर्वात लांब सिक्स

‘विराटसेने’ला मिळाली उपांत्य फेरीत पोहोचण्याची किल्ली! अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज दुखापतीतून सावरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---