टी20 विश्वचषकात यजमान संघ ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (25 ऑक्टोबर) आशिया चषक 2022चा चॅम्पियन संघ श्रीलंकेला 7 विकेट्सने पराभूत केले. कोणत्याही परिस्थितीत विजय हवा असलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात निर्णायक क्षणी खेळ उंचावत श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत करत विश्वचषकातील पहिला विजय मिळवला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने केवळ 18 चेंडूवर सामन्याचा नूर पालटला. असे असले तरी यजमानांनी नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे.
श्रीलंकेने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास ऑस्ट्रेलिया मैदानात उतरला. टी20मध्ये 6 षटकांचा पॉवरप्ले संघांसाठी महत्वाचा असतो. यामुळे प्रत्येक फलंदाजी करणारा संघ अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न करतो. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला असला तरी श्रीलंकेविरुद्ध ते पॉवरप्लेमध्ये एकही चेंडू बॅटने सीमारेषेपार पोहचवू शकले नाहीत. did not score boundry by bat in powerplay
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सहा षटकात एक विकेट गमावत 33 धावा केल्या होत्या. ती विकेट डेविड वॉर्नर याची होती. पॉवरप्ले संपला तेव्हा कर्णधार ऍरॉन फिंच आणि मिशेल मार्श फलंदाजी करत होते. या तिन्ही फलंदाजांच्या बॅटमधून ना चौकार बाहेर पडला ना एक षटकार. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी20 क्रिकेटच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये चेंडू सीमारेषेपार पाठवला नाही. त्यांच्याकडे वॉर्नर आणि फिंचसारखे तुफानी फलंदाज असून सुद्धा असे घडले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फिंच-मार्श यांच्या खात्यात चौकार-षटकारांचा समावेश आहे, पण त्या अतिरिक्त धावा होत्या. त्या त्यांच्या बॅटमधून निघाल्या नाही यामुळे त्या मोजता येणार नाही.
फलंदाज पॉवरप्लेमध्ये एकही चेंडू सीमारेषापार पाठवत नाही अशी घटना टी20 विश्वचषकात दुऱ्यांदाच घडत आहे. याआधी असे 2014 मध्ये पाकिस्तान-वेस्ट इंडिज सामन्यात झाले होते. तेव्हा पाकिस्तानने अशी कामगिरी केली होती. तसेच मागील वर्षी पाकिस्तान-बांगलादेशने टी20 मालिकेतही असेच झाले होते.
श्रीलंकेविरुद्धचा सुपर 12चा सामना ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिस याच्या धुवांधार फलंदाजीने जिंकला त्याने 18 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. तर फिंचही 31 धावा करत नाबाद राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताची आयसीसीकडे तक्रार! सिडनीमध्ये दुपारच्या जेवणात काय होते ज्याने खेळाडू भडकले?
“अर्शदीप झहीरप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी योगदान देईल”; माजी कर्णधाराने व्यक्त केला आशावाद