ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून पुरूषांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय मुख्य संघ 14 सदस्यांसह ऑस्ट्रेलियात दाखल झाला. त्यानंतर शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी हे पण ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत. शमीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने मागील टी20 विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. कोरोनातून ठीक झाल्यानंतर तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट एकॅडमीमध्ये सराव करत होता. त्याने ऑस्ट्रेलियासाठी बुधवारी (12 ऑक्टोबर) प्रयाण केले. त्याच्याबरोबर शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) यानेही सोशल मीडियामार्फत ऑस्ट्रेलिया ट्रीपची माहिती दिली. यामध्ये मोहम्मद सिराज याचे नावही पुढे येत आहे.
View this post on Instagram
शमीने फिटनेस टेस्ट पार केली असून त्याची जसप्रीत बुमराह याच्याजागी मुख्य संघात वर्णा लागण्याची शक्यता आहे. शमी टी20 विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये आहे. हे तिन्ही गोलंदाज पर्थ येथे असलेल्या भारतीय संघात सामील होणार आहेत. या टी20 विश्वचषकात शार्दुल आणि सिराज यांचा समावेस राखीव खेळाडूंमध्ये देखील नव्हता, मात्र दीपक चाहर याच्या दुखापतीमुळे संघात जागा निर्माण झाली आहे.
भारत टी20 विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. यावेळी रोहित शर्मा प्रथमच भारताचे आयसीसी स्पर्धेत नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याआधी भारत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध सराव सामने खेळणार आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, शार्दुल ठाकुर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022: शफाली-हरमनप्रीतच्या महत्वपूर्ण खेळीने उपांत्य फेरीत भारताचे थायलंडसमोर 149 धावांचे लक्ष्य
इंग्लंडने केले ऑस्ट्रेलियाचे टी20 साम्राज्य खालसा! घरच्या मैदानावर विश्वविजेत्यांनी गमावली मालिका