---Advertisement---

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा कोरले टी20 विश्वचषकावर नाव, अंतिम सामन्यात दोन पठ्ठ्यांनी झळकावलं शतक

On: शनिवार, डिसेंबर 17, 2022 7:00 PM
Indian-Blind-Cricket-Team
---Advertisement---

भारतीय ब्लाईंड क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशवर 120 धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतीय संघाने सलग तिसरा किताब आपल्या नावावर केला आहे. तसेच, हा स्पर्धेचा तिसराच हंगाम होता. आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला या स्पर्धेचे विजेतेपद जिंकता आले नाहीये. या विजयानंतर भारतीय ब्लाईंड संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सामन्याचा आढावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्स गमावत 277 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी भारताकडून फलंदाजी करताना दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. सुनील रमेश (Sunil Ramesh) याने 63 चेंडूत 136 आणि अजय रेड्डी (Ajay Reddy) याने 50 चेंडूत 100 धावा करत शतक ठोकले. या दोघांनीही शतकासह तिसऱ्या विकेटसाठी 247 धावांची भागीदारी रचली.

भारताचे 278 धावांचे हे आव्हान पार करताना बांगलादेश संघाला 3 विकेट्स गमावत 157 धावाच काढता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 120 धावांनी आपल्या नावावर केला. यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना ललित मीना आणि अजय कुमार यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

खरं तर, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मोठा वाद झाला होता. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तान संघाला या स्पर्धेत सामील होण्यासाठी भारतात येता आले नव्हते.

यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यावेळी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना उतरलेल्या भारतीय संघाने 1 विकेट गमावत हा सामना 9 विकेट्सने आपल्या खिशात घातला होता. त्यानंतर 2012मध्येही भारताने किताबावर आपले नाव कोरले होते.

भारतीय संघाचा 2022चा हा विजय सर्वात मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, भारताच्या वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांना यावर्षीच्या विश्वचषकात शानदार कामगिरी करता आली नव्हती. (t20 world cup blind 2022 india beat bangladesh to score a hat trick of titles)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी
पॉंटिंगने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, क्षेत्ररक्षणाची रचना पाहूनच सांगितली होती ‘ही’ गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---