---Advertisement---

T20WC: पहिल्याच सामन्यात ‘आशिया चॅम्पियन’ ची पोलखोल, नामिबियाचा श्रीलंकेवर मोठा विजय

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 12:56 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) पहिला सामना रविवारी (16 ऑक्टोबर) श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेला धक्क्यामागे धक्के बसले आहेत. सायमंड्स स्टेडियम, जिलाँग येथे  खेळल्या गेलेल्या सामन्यात नामिबियाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात उत्तम कामगिरी केली. त्यांनी श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करत टी20 विश्वचषकाची विजयी सुरूवात केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका पूर्ण 20 षटकेही खेळू शकली नाही. त्यांनी 19 षटकात सर्वबाद 108 धावसंख्येपर्यंतच मजल मारली. यावेळी श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसांका (9) आणि विकेटकीपर कुसल मेंडीस (6) हे लवकरच बाद झाले. त्यानंतर धनंजया डी सिल्व्हा हा चांगला खेळेल अशी अपेक्षा असताना तो 12 धावांवरच बाद झाला. दनुष्का गुणातिलका हा गोल्डन डक ठरला.

आशिया चषकातमध्ये जो फॉर्ममध्ये होता तो भानुका राजपक्षे देखील 21 चेंडूत 20 धावा करत बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती 10.3 षटकात 5 बाद 74 धावा अशी होती. त्यानंतरही श्रीलंकेचा नामिबियाच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर टीकूच दिले नाही. त्यांचा फिरकीपटू बेर्नार्ड स्टोक्लट्झ याने उत्तम कामगिरी केली. त्यानेच राजपक्षेचा अडसर दूर केला. त्याने 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका हा केवळ काहीसा लढला. त्याने श्रीलंकेकडून सर्वाधिक अशा 29 धावा केल्या.

तत्पूर्वी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. नामिबियाच्या खालच्या आणि मधल्या फळीतील खेळाडूंनी धावफलक हलता ठेवला. एकावेळी ते 15 षटकात 6 विकेट्स गमावत 93 धावा अशा स्थितीत होते. त्यानंतर फ्रायलिंक- जेजे स्मीट यांनी 69 धावांची भागीदारी केली. यामुळे त्यांनी 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावा केल्या.

श्रीलंकेविरुद्ध डेव्हिड विसे, बर्नार्ड शॉल्झ, बेन शिकोंगो आणि जॅन फ्रायलिंक यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. फ्रायलिंकने अष्टपैलू खेळी केल्याने तो सामनावीर  ठरला. त्याने फलंदाजी करताना 28 चेंडूत 44 धावा आणि गोलंदाजीत 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने डी सिल्व्हा आणि शनाकाला बाद केले.

श्रीलंकेविरुद्ध डेव्हिड विसे, बर्नार्ड शॉल्झ, बेन शिकोंगो आणि जॅन फ्रायलिंक यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

https://twitter.com/ICC/status/1581549984956153859?s=20&t=23znc4q3vFkB9NJgspfj2g

हा सामना सुरू होण्याआधीच त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त झाला. त्यातच 2014च्या टी20 विश्वचषक विजेत्याची सुरूवात वाईट झाल्याने श्रीलंकन संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टी20 विश्वचषकात किंवा टी20 सामन्यात श्रीलंका-नामिबिया यांची समोरासमोर येण्याची ही दुसरी वेळ आहे. हे दोन संघ 2021च्या टी20 विश्वचषकात भिडले होते. तेव्हा श्रीलंका वरचढ ठरली होती. त्या सामन्यात नामिबिया अवघ्या 96 धावासंख्येवरच गारद झाली होती. तो सामना श्रीलंकेने 7 विकेट्सने जिंकला होता.

या विश्वचषकात हे दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये असून त्यांच्याबरोबर युएई, नेदरलॅंड्सही आहेत. या चार संघाना सुपर12मध्ये जायचे असेल तर ए ग्रुपमध्ये पहिल्या दोन स्थानावर राहावे लागणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता हे काय मध्येच! वॉर्नर भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर? पण कॅप्टनला नाही कसलीच चिंता
बुमराहविना खेळणाऱ्या टीम इंडियाबद्दल दिग्गजाने केले महत्वाचे वक्तव्य; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---