यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुष टी20 विश्वचषक पार पडणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघात शिखर धवन ऐवजी केएल राहुलला अधिक पसंती देण्यात यावी असे भारताचा माजी सलामीवीर फलंदाज के श्रीकांत रविवारी म्हणाले आहेत.
धवन दुखपतीनंतर बऱ्याच काळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनराआगमनासाठी सज्ज आहे. मागील काही महिने तो दुखापतग्रस्त होता.
त्यामुळे त्याच्या अनुपस्थतित राहूल मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये सलामीवीर म्हणून खेळला. यावेळी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांवर छापही पाडली आहे. त्याचमुळे त्याच्याकडे सलामीवीरासाठी एक प्रबल दावेदार म्हणून पाहिले जात आहे.
श्रीकांत एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाला, श्रीलंका विरूद्ध धावा करणे काही महत्वाचे नाही. मी जर निवड समितीचा अध्यक्ष असतो. तर मी टी20 विश्वचषकासाठी शिखर धवनची निवड केली नसती. शिखर आणि राहूल यांच्यामध्ये कोणतीही प्रतिस्पर्धा नाही आहे.
34 वर्षाचा सलामीवीर फलंदाज शिखरने मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये वेस्टइंडीज विरूद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला होता. तर राहूलने वेस्टइंडीज विरूद्ध डिंसेबर महिन्यामध्ये वनडे आणि टी20 मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली होती.
जो विक्रम सचिनने भारतासाठी केला तोच विक्रम टेलरने न्यूझीलंडसाठी केला!
वाचा👉https://t.co/2tGbxUFMhj👈#म #मराठी #Cricket #AUSvNZ @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
सामना झाला नाही पण भारतीय जुगाडाची झाली सगळीकडेच चर्चा
वाचा👉https://t.co/nlqu4bDWqG👈@BCCI #म #मराठी #Cricket #INDvSL— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020