T20 World Cup 2024: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांना आशा आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहली 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळतील.रोहित आणि विराटने टी20 विश्वचषक 2022च्या सेमीफायनलनंतर या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांना संघात परत स्थान देण्यात आले आहे.
श्रीकांत (K Srikanth) म्हणाले की, “जर रोहित शर्मा (Rohit Sharma) निवडीसाठी उपलब्ध असेल तर संघ व्यवस्थापन त्याला वगळू शकत नाही. एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर 36 वर्षीय खेळाडू दु: खी आहे आणि वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार्या टी 20 विश्वचषकात खेळून निवृत्ती घेऊ इच्छित आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने तो या स्पर्धेत नक्कीच सहभागी होईल.”
त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “विराट कोहलीला खात्री आहे. तो जबरदस्त फॉर्मात आहे. रोहित शर्माला विश्वचषकात त्याने किती धावा केल्या याबद्दल कदाचित आत्मविश्वास आहे. तो पुन्हा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. जर रोहित शर्मा म्हणाला की, मी उपलब्ध आहे, तर तुम्ही त्याला वगळू असे म्हणू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले, “विश्वचषक 2023 गमावल्यामुळे रोहित शर्माही दुखावला आहे. निदान विश्वचषक हातात घेऊन निवृत्त व्हायला त्याला आवडेल. 2007 च्या विश्वचषकात तो संघात होता. त्याला असेच काहीतरी करायचे आहे, विश्वचषक जिंकायचा आहे आणि नंतर निवृत्त व्हायचे आहे.”
आतापर्यंतच्या महान खेळाडूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीला अद्याप टी20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. मागील टी20 विश्वचषकाच्या वेळी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि सध्या तो शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्याबद्दल श्रीकांत म्हणाले, “विराट कोहलीला टी20 विश्वचषक नक्कीच जिंकायचा आहे. याशिवाय गेल्या वर्षी केवळ 13 महिन्यांपूर्वी टी20 विश्वचषक झाला होता. तेव्हा विराट कोहली कमालीच्या फॉर्ममध्ये होता. तो उपलब्ध असल्याने तुम्ही त्याला वगळू शकता. असे मला वाटत नाही.” (T20 World Cup If Rohit is available you can’t skip him says former legend on T20 World Cup)
हेही वाचा
‘ललित मोदींनी मला कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती,’ आयपीएलबाबत प्रवीण कुमारचा धक्कादायक खुलासा
रोहित की हार्दिक, 2024 टी20 विश्वचषकात कोण असेल भारताचा कर्णधार? आकाश चोप्राने घेतले ‘हे’ नाव