भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या भलताच फॉर्मात आहे. सूर्या सातत्याने भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. आता हीच कामगिरी तो टी20 विश्वचषक 2022च्या सराव सामन्यातही करताना दिसत आहे. त्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सराव सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, यादरम्यान तो ज्या पद्धतीने बाद झाला, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे, तो अर्धशतकानंतर असे काहीतरी बोलला आणि पुढच्याच चेंडूवर बाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या सामन्यात दमदार अंदाजात दिसला. आपल्या डावादरम्यान त्याने अनेक पॅडल आणि स्वीप शॉट मारले. त्याने यावेळी फलंदाजी करताना 33 चेंडूत 50 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 6 चौकार मारले. यावेळी त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर सूर्यकुमारने दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या अक्षर पटेल याला म्हटले की, तो चेंडू मारण्याच्या मूडमध्ये नाहीये. त्याचा हा आवाज स्पष्टरीत्या ऐकू येत होता.
https://www.instagram.com/reel/CjzborJpbxO/?utm_source=ig_embed&ig_rid=6f74ed2e-ac0c-4899-8762-328d476b62fb
विशेष म्हणजे, असे म्हटल्यानंतर तो पुढच्याच म्हणजेच विसाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. डावाच्या शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या केन रिचर्ड्सन (Kane Richardson) याच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार हर्षल पटेलला म्हणाला होता की, “चेंडू मारायची इच्छा होत नाहीये यार.” आता त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
@surya_14kumar – Maarne ka mood hi nahi ho raha yaar
Got out very next ball #AUSvIND #T20WorldCup #T20WorldCup2022 pic.twitter.com/TWBM2zSAtA— Aditya Kukalyekar (@adikukalyekar) October 17, 2022
सामन्याचा आढावा
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 7 विकेट्स गमावत 186 धावा चोपल्या. या धावा करताना भारताकडून केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सर्वाधिक धावा चोपल्या. राहुलने 57, तर सूर्यकुमारने 50 धावा चोपल्या. त्यांच्याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक (20), विराट कोहली (19) आणि रोहित शर्मा (15) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 180 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाकडून केन रिचर्ड्सन याने 4 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेपाठोपाठ वेस्ट इंडिजही गारद, स्कॉटलंडचा दोन वेळेच्या चॅम्पियनवर 42 धावांनी विजय
VIDEO:…आणि सर्वांच्या काळजात धस्स झालं! सूर्याच्या डोक्यावर आदळला स्टार्कचा घातक चेंडू