ऑस्ट्रेलियात पुरूष क्रिकेट संघाचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) सुरू आहे. यामध्ये यजमान संघाबरोबर पाकिस्तान, इंग्लंड या चॅम्पियन संघांची स्थिती बिकट होताना दिसत आहे. वेस्ट इंडिज तर पहिल्या फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला आहे. यामुळे कोणता संघ उपांत्य फेरीत पोहचणार याबाबत कोडे निर्माण झाले आहे. गुरूवारी (27 ऑक्टोबर) पाकिस्तानला झिम्बाब्वे विरुद्ध अवघ्या एका धावेने सामना गमवावा लागला आणि त्यांचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले. यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे, मात्र काहींनी भारतही या स्पर्धेतून बाहेर पडेल अशी दुषणे दिली आहेत.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यात पाकिस्तानला पराभूत व्हावे लागेल याचा कोणी विचारही केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर खूपच दुखी झाला. त्याने त्याच्या युट्युबच्या चॅनलवर बोलताना म्हटले, “मी आधीच म्हटले होते, पाकिस्तान या आठवड्यात विश्वचषकातून परतणार आणि भारत पुढील आठवड्यात. भारत काही तीस मार खान थोडीच आहे.”
भारत या विश्वचषकाच्या सुपर -12मध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत पहिले स्थान काबीज केले आहे. भारताचे बाकी सामने दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे आहेत. तर त्याच ग्रुपमध्ये पाकिस्तान गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत, कारण त्यांनी त्यांचे दोन्ही सामने गमावले. त्यांचे पुढील सामने नेदरलॅंड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध आहेत.
झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 षटकात 8 विकेट्स गमावत 130 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 129 धावा केल्या. यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा याने उत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला. त्याचा हा चालू स्पर्धेतील तिसरा आणि 2022मधील आंतरराष्ट्रीय टी20मधील सातवा सामनावीराचा पुरस्कार ठरला आहे
तसेच झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियात 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यातील त्यांचा हा तिसरा विजय ठरला. दुसरीकडे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात एकही टी20 सामने जिंकलेला नाही, मात्र त्यांनी आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! जयवर्धनेचा विक्रम मोडण्यापासून विराट फक्त 27 धावा दूर, गेलला सोडलंय मागे
“बाबर आझम पुढचे 5 ते 10 वर्ष पाकिस्तान संघाचे नेतृत्व करू शकतो”