ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकाची (T20 World Cup) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय संघ विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत गुरूवारी (6 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला रवाणा झाला आहे. यामध्ये 15 नाही तर 14 मुख्य संघातील खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि प्रशिक्षक स्टाफ याचां समावेश आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर ऑस्ट्रेलियाला जाण्याआधीचा फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये दीपक हुड्डा हा पण दिसत आहे.
या स्पर्धेत भारत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. रोहितची आयसीसी स्पर्धेतमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर झाल्याने भारत 14 सदस्यासोबत ऑस्ट्रेलियाला रवाणा झाला आहे. तसेच राखीव खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दीपक हुड्डा पण आहे. त्याने भारताकडून शेवटचा टी20 सामना आशिया चषकात खेळला होता. त्यानंतर तो दुखामतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकांना मुकला होता. त्याने 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांतील 9 डावांमध्ये खेळताना 41.85च्या सरासरीने 293 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे.
भारतीय संघाला टी20 विश्वचषकाआधी घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. त्या मालिकेत अय्यर आणि चाहर हे संघाचा भाग आहेत, तर दुसरीकडे कोरोनातून सावरलेल्या शमीला एनसीएमध्ये (राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमी, बंगळुरू) फिटनेस टेस्ट द्यायची आहे. त्यामध्ये पास झाल्यावर तो ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. त्याचे ऑस्ट्रेलियाला जाणे रद्द झाले तर मोहम्मद सिराज याची संघात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Picture perfect 📸
Let's do this #TeamIndia@cricketworldcup, here we come ✈️ pic.twitter.com/XX7cSg3Qno
— BCCI (@BCCI) October 5, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितच्या जागी शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार आहे. त्याने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौऱ्यात भारताचे वनडे मालिकेत नेतृत्व केले होते. त्या दोन्ही मालिका भारताने जिंकल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. यातील दुसरा सामना 9 ऑक्टोबरला आणि 11 ऑक्टोबरला अनुक्रमे रांची आणि दिल्ली येथे खेळले जाणार आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू-
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, दीपक चाहर.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रूतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान , मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त