आयसीसीच्या टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ फेरीचे बिगुल वाजले असून आतापर्यंत यामध्ये बरेचसे अविश्वसनीय निकाल पाहायवास मिळाले आहेत. पहिल्यांदाच पाकिस्तानच्या हातून भारताचा पराभव, नामबियाचा सुपर १२ फेरीत प्रवेश आणि त्यानंतर पहिल्याच सामन्यात विजय संपादनही. अशा रोमहर्षक लढतींनी भरलेल्या सुपर १२ फेरीत बुधवारपर्यंत (२७ ऑक्टोबर) एकूण ९ सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
यापैकी बहुतांश सामन्यांमध्ये ज्या संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आहे, त्याच संघाने सामन्यातही बाजी मारली आहे. यावरुन युएईच्या कोणत्याही मैदानावर नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या पारड्यात पडेल, तोच संघ सामन्यात विजय मिळवणार, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत बुधवारपर्यंत एकूण ९ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये गट १ आणि गट २ मधील सर्व १२ संघांनी प्रत्येकी १ सामना खेळला आहे. या सर्व सामन्यांमधील अफगानिस्तान विरुद्ध स्कॉटलँड सामना वगळता इतर सर्व सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयी बनला आहे. केवळ अफगानिस्तान संघाने, प्रथम फलंदाजी केल्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करू दिलेला नाही.
आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ‘टॉस ठरलाय बॉस’
१. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – ऑस्ट्रेलिया ५ विकेटने विजयी
२. इंग्लंडने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – इंग्लंड ६ विकेटने विजयी
३. श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – श्रीलंका ५ विकेटने विजयी
४. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला- पाकिस्तान १० विकेटने विजयी
५. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला- अफगाणिस्तान १३० धावांनी विजयी
६. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय – दक्षिण आफ्रिका ८ विकेटने विजयी
७. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – पाकिस्तानचा ५ विकेटने विजयी
८. इंग्लंडने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला – इंग्लंडचा ८ गडी राखून विजयी
९. नामबियाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला – नामबिया ४ विकेटने विजयी
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्याशी बोलणं म्हणजे स्वतःवर चिखल उडवून घेण्यासारखे’; भज्जी आमीरवर पुन्हा बरसला
ऑस्ट्रेलिया-श्रीलंका संघांमध्ये कोणाची कामगिरी सरस? कशी असेल उभयंताची प्लेइंग इलेव्हन? वाचा सर्वकाही
नामबिया संघाची गुणतालिकेत मोठी उडी, भारत अन् न्यूझीलंडला पछाडत टॉप-३ मध्ये धडक