पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतावर ऐतिहासिक विजय नोंदवून आयसीसी टी२० विश्वचषक मोहिमेला शानदार सुरुवात केली. भारताने दिलेले १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने नाबाद भागीदारी रचत १० गडी राखून विजय मिळवला. टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचा भारताविरुद्धचा पहिलाच विजय आणि भारताचा पहिला पराभव आहे. टी२० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि पाकिस्तान सहाव्यांदा आमनेसामने आले होते. याआधी खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवलेला. सुपर १२ सामन्यांच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने व दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विजय मिळवत इतिहास रचला आहे.
इंग्लंडचा शानदार विजय
सुपर १२ फेरी च्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडीजवर ५ गडी राखून विजय मिळवला होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत गतविजेत्या वेस्ट इंडीजला अवघ्या ५५ धावांवर गारद केले होते. प्रत्युत्तरात पाच बळी गमावून इंग्लंडने हा विजय मिळवला. याचबरोबर विश्वचषकात वेस्ट इंडीजला कधीही पराभूत न करण्याची मालिका इंग्लंडने खंडित केली. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यापूर्वी टी२० विश्वचषकात पाच वेळा आमनेसामने आले होते. या पाचही सामन्यात वेस्ट इंडीजने सरशी साधलेली. यामध्ये २०१६ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचाही समावेश होता.
पाकिस्तानने रचला इतिहास
रविवारी दुबई येथे झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने दहा गडी राखून विजय मिळवताना भारताला प्रथमच टी२० विश्वचषकात पराभूत केले. भारत आणि पाकिस्तान यापूर्वी २००७ टी२० विश्वचषकात दोनदा व २०१२, २०१४ आणि २०१६ विश्वचषकात प्रत्येकी एकदा आमनेसामने आले होते. या प्रत्येक वेळी भारताने विजय मिळविलेला. पाकिस्तानला पराभूत करत भारताने पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले होते.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या या विजयामुळे स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसातच दोन ऐतिहासिक विजय साजरे झाले असून, उर्वरित स्पर्धेत आणखी रोमांचक सामने पाहायला मिळतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २९ वर्षांची परंपरा विराटच्या नेतृत्वात झाली खंडित; ‘या’ कर्णधारांनी उंचावलेली मान
https://mahasports.in/168091-2/