ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup)प्रारंभ झाला आहे. पुरूषांचा हा आठवा टी20 विश्वचषक असून या स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. ज्या भारतीय खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली त्यापैकी सर्वाधिक अनुभव रोहितला आहे. त्याचा हा आठवा टी20 विश्वचषक आहे. त्याच्यानंतर विराट कोहली सर्वाधिक अनुभवी आहेत. त्याचा हा कारकिर्दीतील पाचवा टी20 विश्वचषक आहे. या टी20विश्वचषकात रोहित आणि विराटकडे एक विक्रम करण्याची संधी आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपण्याचा हा विक्रम आहे.
2007 पासून सुरु झालेल्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2012 ते 2021 या कालावधीत टी20 विश्वचषकात 21 सामने खेळताना 10 अर्धशतकांच्या मदतीने 845 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 2007 ते 2021 या दरम्यान टी20 विश्वचषकाचे 33 सामने खेळताना 8 अर्धशतकाच्या साहाय्याने 847 धावा केल्या आहेत. त्यांच्यापुढे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान, वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू माहेला जयवर्धने हे आहेत.
जयवर्धने हा सर्वाधिक धावांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. त्याने 2007 ते 2014 दरम्यान एकूण 31 सामने खेळताना 40 च्या सरासरीने 1016 धावा केल्या आहेत. टी20 विश्वचषकात 1000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. त्याच्यानंतर गेल 33 सामन्यांमध्ये 965 धावा करत दुसऱ्या स्थानी आहे. तर दिलशान 35 सामन्यांमध्ये 897 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
विराटला या विक्रमात अव्वलस्थानी विराजमान होण्यासाठी अजून 162 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला 160 धावांची आवश्यकता आहे. जर या दोघांपैकी एकाने जरी यंदाच्या टी20 विश्वचषकात या धावांचा आकडा पार केला तर सर्वाधिक धावा करत जयवर्धनेचा ७ वर्षे जुना विक्रम उध्वस्त करेल.
टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणारे पुरूष खेळाडू-
1016 – माहेला जयवर्धने
965 – ख्रिस गेल
897 – तिलकरत्ने दिलशान
847 – रोहित शर्मा
845 – विराट कोहली
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली, बाबर-रिझवान यांनी एकत्र केलेल्या नेट प्रॅक्टिसचा व्हिडिओ पाहिला का?
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी