आयपीएल 2024 च्या हंगामात डेविड वार्नर (David Warner) दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. परंतु त्यानं या हंगामात फलंदाजीची चमक दाखवली नाही. आगामी टी20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनं सराव सामन्यात धुमाकुळ घातला. वार्नरनं नामीबियाविरुद्ध असलेल्या सराव सामन्यात 257.14 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. त्यानं केवळ 21 चेंडूत 54 धावांची आक्रमक खेळी खेळली. त्यामध्ये 6 षटकारांसह 3 चौकारांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियानं टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात नामीबीया संघाला 7 विकेट्सनं पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामीबीया सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला. या सामन्यात नामीबीयानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावून मात्र 119 धावा केल्या. ऑस्ट्रलियानं नामीबीयावर गोलंदाजीचा जोरदार मारा केला. ऑस्ट्रलियानं अवघ्या 75 धावांवर नामीबीयाच्या 7 गड्यांना तंबूत पाठवले.
नामीबीयासाठी आठव्या स्थानावर फलंदाजीला मैदानात आलेल्या जेन ग्रीनने 38 धावांची खेळी खेळली आणि नामीबीयाला कसेबसे 100 धावांच्या पार पोहोचवले. नामीबीयाचे टाॅपऑर्डर फलंदाज 15 धावादेखील करु शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना गारद केले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एडम झम्पाने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज जाॅश हेझलवुजडनं 2 बळी घेतले. टिम डेविड आणि नाथन एलिसनं प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
ऑस्ट्रेलियासाठी 120 धावांच खूप किरकोळ आव्हान होत. ऑस्ट्रेलियासाठी सालामीला आलेल्या मिचेल मार्श आणि डेविड वाॅर्नरनं पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श 18 धावांवरती तंबूत परतला त्यानंतर लगेच जाॅश इंग्लिस 5 धावांवरती बाद झाला. टिम डेविड आणि डेविड वाॅर्नर यांनी संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. डेविड वाॅर्नरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रलियानं केवळ 10 षटकात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
अल्टिमेट टेबल टेनिस 2024 नव्या रुपात; 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या हंगामात 8 संघ जेतेपदासाठी भिडणार
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी कोण ठरणार पात्र जाणून घ्या बीसीसीआयचे नियम व अटी?
ऑरेंज कॅप मिळताच विराट कोहली झाला भावूक म्हणाला..”ऑरेंज कॅप मिळणे..”