टी20 विश्वचषक 2022मध्ये सोमवारी (17 ऑक्टोबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सराव सामना खेळला गेला. यामध्ये गतविजेता ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्या विलक्षण खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावत 186 धावा केल्या.
ब्रिसबेनच्या गाबा येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या 6 षटकातच 70 धावा केल्या. यादरम्यान राहुलने 27 चेंडूत अर्धशतक केले. यामुळे पहिला पॉवरप्ले भारताच्या नावे राहिला.
भारताच्या डावाची 10 षटके झाली असता भारत 2 विकेट्स गमावत 89 धावसंख्येवर पोहोचला. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा लवकरच बाद झाला. त्याने 14 चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारत 15 धावा केल्या. त्याला ऍश्टन एगर याने ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले. राहुलने त्याच्या डावामध्ये 172.72च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केल्यी. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 33 चेंडूत 57 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली यानेदेखील लवकरच आपली विकेट गमावली. तो 19 धावांवर असताना त्याला मिशेल स्टार्कने बाद केले.
रोहित-विराट लवकर बाद झाल्याने भारताचा धावफलक काहीसा संथ झाला होता, तेव्हा पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव याने स्फोटक फलंदाजी करत त्याला गती दिली. भारताच्या डावाची 15 षटके झाली असता धावसंख्या 4 बाद 138 अशी होती. सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. त्याला केन रिचर्डसन यानेच त्याच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. तसेच दिनेश कार्तिकही 14 चेंडूत 20 धावा करत बाद झाला.
Innings Break!
Half-centuries from @klrahul (57) & @surya_14kumar (50) propel #TeamIndia to a total of 186/7 on the board.
Scorecard – https://t.co/3dEaIjz140 #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/vH0gy8xJnh
— BCCI (@BCCI) October 17, 2022
ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 30 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने हार्दिक पंड्या (2) , सूर्यकुमार, कार्तिक आणि आर अश्विन (6) यांना बाद केले.
भारताने राहुल-सूर्यकुमार यांच्या अर्धशतकामुळे मोठी धावसंख्या उभारली असली तरी भारताच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली टी20 विश्वचषकानंतर होणार निवृत्त? प्रशिक्षकानींच केला खुलासा!
विराट भाऊंनी मैदानावरच धरला ठेका, संघसहकाऱ्यांसमोर केला ‘असा’ डान्स; तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात’