---Advertisement---

T20WC 2022: गंभीरने शाहीन आफ्रिदी तर पठानने बाबर-रिझवान यांच्याविरुद्ध सांगितला ‘गेम प्लान’

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 1:43 PM
Team India
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा हंगाम ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. अवघे दोन दिवस शिल्लक असलेल्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. यामुळे आजी माजी क्रिकेटपटूंनी आपली मते, सल्ले देणे सुरू केले आहे. भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळला जाणार आहे. यासाठी भारताच्या माजी दोन क्रिकेटपटूंनी या सामन्यात भारताने कसा खेळ करावा आणि शाहीन आफ्रिदीचा कसा सामना करावा हे सांगितले आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने पाकिस्तानच्या गोलंदाजीविरोधात कशी खेळी करावी आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याच्या गोलंदाजीचा कसा सामना करावा हे सांगितले आहे. तो म्हणाला, “आफ्रीदीच्या गोलंदाजीवर बाद होण्याचे टेंशन न घेता त्याच्या विरुद्ध धावा करा. नवीन चेंडूने आफ्रिदी घातक ठरतो हे मला माहित आहे तरी देखील फलंदाजांनी त्याच्या विरुद्ध धावा करण्याचा मार्ग काढला पाहिजे. भारताकडे सुरूवातीचे 3 ते 4 फलंदाज असे आहेत जे त्याच्याविरुद्ध धावा करू शकतात.”

दुसरीकडे भारताचा अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) याने म्हटले, “तुम्ही एमसीजीवर खेळता तेव्हा तेथील सरळ सीमारेषा मोठी नाही, मात्र बाजूची सीमारेषा लांब आहे. यामुळे भारताला फलंदाजी करताना स्मार्ट होण्याची आवश्यकता आहे. तसेच फलंदाजाला बाजूच्या सीमारेषेपार चेंडू पाठवण्यासाठी गॅप शोधणे अवघड होत असेल तर रनिंग बिटवीन विकेट म्हणजे एकेरी, दुहेरी धावा काढल्या पाहिजे.”

“भारतीय गोलंदाज जेव्हा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना चेंडू टाकत असेल तर थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. रिझवानला बाहेर जाणारे चेंडू टाकणे टाळा कारण तो पॉवरप्लेमध्ये घातक ठरतो. बाबर खेळपट्टीवर टीकण्यासाठी अधिक वेळ घेतो यासाठी त्याला फ्रंट फुटवर गोलंदाजी करा. तसेच पाकिस्तानची फलंदाजी स्पिनर्स विरुद्ध अधिक चांगली नाही अशात पॉवरप्लेमध्ये स्पिनर्सकडून गोलंदाजी करवून घ्या,” असेही पठाणेने पुढे म्हटले आहे.

गंभीर आणि पठाण यांनी ही मते स्टार स्पोर्ट्सच्या गेम शोमध्ये मांडली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी ‘शो’ सुरूच! षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकले वादळी शतक; मुंबई 20 षटकात 3 बाद 230
टी20 विश्वचषकापूर्वीच पाकिस्तानची दादागिरी! तिरंगी मालिकेत घरच्याच मैदानावर न्यूझीलंडचा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---