सेरेना विल्यम्स ८ आठवड्यांची गरोदर असताना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यामुळे सर्वच स्थरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना एका नायजेरियन महिला खेळाडूची अशीच काहीशी गोष्ट पुढे आली आहे. नायजेरियन टेबल टेनिसपटू ओलूफुंके ओशोंनाइके ही एकदा नाही तर दोन वेळा गरोदर असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे.
२८ ऑक्टोबर १९७५ साली जन्म झालेल्या ओलूफुंके ओशोंनाइके जेव्हा २७ वर्षांची होती तेव्हा ती ती पहिल्यांदा गरोदर असताना २००२ सालच्या आफ्रिकन चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरी आणि महिला दुहेरीमध्ये दोन पदके जिंकली होती.
अविश्वसनीय…
बाळाला जन्म दिल्यानंतर तिने लगेचच २००३ मध्ये आफ्रिकन गेम्समध्ये जोरदार कमबॅक करत ४ पदके जिंकली. त्यात महिला एकेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी आणि सांघिक पादकांचा समावेश होता.
कल्पनेपलीकडे…
दुसऱ्या गरोदरपणात, वयाच्या ३१ व्या वर्षी ती जर्मन लीगमधील सर्व सामने खेळली. तसेच लिएभेर्र्र येथे झालेल्या जागतिक सांघिक टेबल टेनिस चॅम्पियनशिप मध्ये ती नायजेरियन संघाची पूर्णवेळ सदस्य होती. तिने त्या वेळी ७ महिन्याची गरोदर असेपर्यंत टेबल टेनिस खेळत होती.
ओलूफुंके ओशोंनाइके ही ६ वेळा ऑलिम्पिक मध्ये खेळलेली खेळाडू असून अशी कामगिरी करणारी फक्त दुसरी खेळाडू आहे. तिने आफ्रिकन गेम्समध्ये १२ पदक जिंकली आहेत. ती सध्या ४१ वर्षांची असून आजही त्याच इर्षेने टेबल टेनिस खेळते.
सेरेना बद्दल
सेरेना बद्दल बोलताना ओलूफुंके म्हणते, ” मला सेरेनाचा अभिमान वाटतो. मला ती गरोदर असण्याचं विशेष असं काही वाटलं नाही. सेरेना एक जबदस्त आणि सकारात्मक खेळाडू आहे.”