पार्लच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह दक्षिण आफ्रिका संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रिषभ पंतने (Rishabh pant) भारतीय संघाकडून सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली होती. यानंतर या सामन्यात रिषभ पंतला बाद करणाऱ्या तबरेज शम्सीने (Tabrez shamsi) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. (Tabrez shamsi social media post)
या सामन्यात भारतीय संघाकडून रिषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली होती. परंतु तबरेज शम्सीच्या गोलंदाजीवर तो ८५ धावांवर बाद होऊन माघारी परतला होता. बाद होऊन माघारी जात असताना रिषभ पंत भलताच चिडला होता. तसेच तबरेज शम्सीने देखील जोरदार सेलिब्रेशन केले होते.
तर झाले असे की, लाँग ऑनच्या वरून मारण्याच्या प्रयत्नात रिषभ पंतने स्टेप आऊट होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याचा हा प्रयत्न फसला. त्याने मारलेल्या शॉटवर एडम मार्करमने अप्रतिम झेल टिपला होता. तो बाद झाल्यानंतर तबरेज शम्सीने हटके सेलिब्रेशन केले. तर रिषभ पंत भलताच चिडला होता. हटके सेलिब्रेशननंतर तबरेज शम्सीने रिषभ पंतच्या फलंदाजीचे कौतुक करत त्याची पाठ देखील थोपटली. त्याने सोशल मीडियावर रिषभ पंतची पाठ थोपटत असतानाचा फोटो शेअर केला. ज्यावर कॅप्शन म्हणून त्याने, “चांगलं खेळ.. पण मर्यादा कधीही ओलांडू नको,” असे लिहिले आहे.
Work hard… play hard…. but never cross the line 👌#Respect #SpiritOfCricket pic.twitter.com/P9MJvAlO8R
— Tabraiz Shamsi (@shamsi90) January 22, 2022
हा सामना झाल्यानंतर रिषभ पंतने म्हटले की, “मला असे वाटते की, खेळपट्टी संथ होती. मला तर वाटत होते की, आम्हाला हव्या तितक्या धावा आम्ही केल्या आहेत. पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे जरा कठीण होते. कारण खेळपट्टी आणखी संथ झाली होती. दुसऱ्या वनडे सामन्यात देखील असेच काही झाले. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या मध्यक्रमातील फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. हेच कारण होते की, त्यांना धावांचा पाठलाग करण्यात यश आले. केएल राहुल आणि माझ्यात चांगली भागीदारी झाली होती. जर आम्ही पुढे गेलो असतो तर आणखी १५-२० धावा जोडल्या असत्या.”
The drinks break doing the trick🍹
How good was that from Aiden Markram?🤩 #SAvIND #BetwayODISeries #BePartOfIt pic.twitter.com/g1ZzBrcscf
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 21, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
नमन ओझाची झंझावाती शतकी खेळी; लिजेंड्स लीगचा पहिला शतकवीर होण्याचा मिळविला मान
राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते
हे नक्की पाहा: