आर्य सेवा मंडळाच्या विद्यमाने आणि मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने दि. १६जाने. पासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू ह्रदयसम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे व स्व. मा. मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ महिला गटाची कबड्डी स्पर्धा आर्यनगर, ताडदेव, मुंबई या ठिकाणी होणार आहे.
यास्पर्धेत मुंबई शहर मधील १२ महिला संघ सहभागी होणार असून दिनांक १६ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ दरम्यान स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
अंतिम विजयी संघास ५,००० रुपये, उपविजयी संघास ३,००० रुपये, उपांत्य उपविजयी संघास १,००० रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चढाईपटू, पकडपटु व मालिकवीर अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. अशी माहिती स्पर्धा आयोजक दिगंबर शिरवाडकर यांनी दिली.