Manchester United
ट्रान्सफर विंडो: इंग्लिश प्रिमीयर लीग आणि ला लीगामध्ये खेळणारे पहिले पाच संभाव्य खेळाडू
फिफा विश्वचषक संपल्यावर आता इंग्लिश प्रिमीयर लीग(इपीएल) आणि ला लीगामध्ये क्लबमधील खेळाडूंच्या ट्रान्सफर विंडोला सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीच्या उन्हाळ्यातील ट्रान्सफर विंडो 17 मे ला सुरू....
रियल माद्रिदचा संघ ठरला डब्लूडब्लूईचा चॅम्पियन
सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकणारा रियल माद्रिदचा संघ आता डब्लूडब्लूई चा ही चॅम्पियन झाला आहे. मे महिन्यात जिंकलेले हे रियलचे 13वे विजेतेपद ठरले. तसेच....
झ्लाटन इब्राहिमोविचने केली गोलची हॅट्रिक, मेजर लीग सॉकरमधील त्याची पहिलीच हॅट्ट्रीक
स्वीडनचा माजी फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमध्ये त्याची पहिलीच तर एल ए गॅलक्सीच्या इतिहासातील 20वी हॅट्ट्रीक केली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत....
आता वेगाचा बादशहा उसेन बोल्ट खेळणार फूटबाॅल
सॉकर एड 2018चा सामना विश्व एकादश विरूध्द इंग्लंड हा येत्या 10 जूनला होणार आहे. हा सामना मॅंचेस्टर युनायटेडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.....
Premier League: मॅन्चेस्टर सिटीचे वर्चस्व कायम, विजेतेपदाची दावेदारी केली आणखी भक्कम
प्रिमियर लीग जशी जशी पुढे सरकते आहे तसे या वर्षी कोणता संघ विजेतेपद पटकवणार ते स्पष्ट होत आहे. लीगच्या पहिल्या सामन्यापासूनच आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या....
Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर
प्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. १९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल. काल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले. पहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती. या मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला. # सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला. # या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे. # युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता. # आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.
Premier League: मॅन्चेस्टर सिटीचा दबदबा कायम, टोट्टेन्हमचा केला ४-१ असा पराभव
काल प्रिमियर लीगच्या १८ व्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे सामने पार पडले. अर्सेनल, चेल्सी, मॅन्चेस्टर सिटी, टोट्टेन्हम हाॅटस्पर्स, बर्नले, आणि लिचेस्टर सिटी अश्या प्रमुख संघांचे सामने....
चॅम्पियन्स लीग ड्राॅ: चेल्सी भिडणार बार्सिलोनाशी तर जुवेंटसचा सामना टोट्टेन्हमसोबत
आज युएफा चॅम्पियन्स लीगचा अंतिम १६ संघांचे भवितव्य ठरवणारा ड्राॅ पार पडला. ८ गटातून ८ उपविजेत्या संघांचे उर्वरित गटाच्या विजेत्या संघातील एका संघाबरोबर सामना ठरणार....
मॅन्चेस्टर डार्बी मध्ये ठरणार विजेतेपदाचा प्रमुख दावेदार
आज प्रिमियर लीगच्या गुणतालीकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मॅन्चेस्टरच्या २ संघांचा सामना आहे. मॅन्चेस्टर डार्बी म्हणून प्रसिद्ध असलेला सामना आज युनाएटेडच्या घरच्या म्हणजेच ओल्ड....
युएफाचे साखळी सामने आता अंतिम टप्प्यात
आज युएफा चॅम्पियन्स लीगच्या ६व्या साखळी सामन्याच्या फेरीचे काही सामने झाले तर उर्वरीत सामने उद्या खेळवले जातील. आजच्या सामन्यानंतर १२ संघांनी अंतिम १६ मध्ये आपले....
Premier League: मॅन्चेस्टर सिटीची विजयी घौडदौड कायम
काल प्रिमियर लीगमध्ये मॅन्चेस्टर सिटीने वेस्ट हॅमला २-१ ने हरवत आपला दबदबा कायम राखला. सिटी तर्फे ओटामेंडी आणि डेविड सिल्वाने ५७ आणि ८३ व्या मिनिटला....
असे ५ अंडर १७ भारतीय खेळाडू जे भारतीय क्लबमधून खेळू शकतात
भारतात होत असलेल्या विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर पडला आहे. परंतु या विश्वचषकाने अंडर १७ खेळाडूंना ओळख आणि प्रसिद्धी मिळवून देण्याचे खूप मोठे काम या क्रिकेटवेड्या....
प्रिमीयर लीग: मॅन्चेस्टर युनाइटेडच्या विजयी रथाला लागला लगाम
प्रिमीयर लीगचा ९ वा आठवडा लीगच्या टेबल मध्ये काही उलटफेर तर काही अपेक्षित निकाल घेऊन आला. मॅन्चेस्टर युनाइटेडला हुडर्सफील्ड बरोबरच्या सामन्यात २-१ ने पराभवाला सामोरे....





