---Advertisement---

इतिहास घडला, वडीलांनी केलं मुलालाच क्रिकेटमध्ये धावबाद!

On: शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2018 3:11 PM
---Advertisement---

काल सीड्ब्लूआय सुपर ५० स्पर्धेत विंडवार्ड वोल्कनोस विरुद्ध गयाना जॅगवार्स सामन्यात विंडवार्ड वोल्कनोस संघाने गयाना जॅगवार्सवर विजय मिळवला. यात पराभूत गयाना जॅगवार्स संघाकडून टॅगेनारायण चंद्रपाॅल आणि चंद्रपाॅल हेमराज हे फलंदाज सलामीला आले. 

पहिल्याच षटकात चंद्रपाॅल हेमराज बाद झाल्यावर मैदानात शिवनारायण चंद्रपाॅल आणि टॅगेनारायण चंद्रपाॅल ही बाप-लेकांची जोडी खेळत होती. 

चांगला जम बसलेल्या शिवनारायण चंद्रपाॅलने जेव्हा ५व्या षटकातील ४थ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइवचा फटका मारला तेव्हा तो रायन जाॅन या गोलंदाजाच्या हाताला लागुन थेट यष्टींना लागला. 

यावेळी धाव घेण्यासाठी पुढे आलेला  टॅगेनारायण चंद्रपाॅल मात्र धावबाद झाला. त्यामुळे संघाची अवस्था २ बाद २० अशी झाली आणि अखेर संघाला ५२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 

यामुळे क्रिकेटमध्ये बाप-लेक धावबाद होण्याचा दुर्मीळ योगायोग मात्र पहायला मिळाला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment