टी२० क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद स्वरूप आहे. या स्वरूपात फलंदाज संथगतीने धावा काढण्यापेक्षा धुव्वादार फटकेबाजी करत धावा काढण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या सरासरीपेक्षा त्यांचा स्ट्राईक रेट जास्त महत्त्वाचा ठरतो. परंतु एक क्रिकेटपटू आहे, जिचा टी२० क्रिकेटमधील स्ट्राईक रेट तर कमालीचा आहेच, सोबतच तिची सरासरीही सर्वांना तोंडात बोटे घालायला भाग पाडणारी आहे.
ही क्रिकेटपटू अजून कोण नसून ऑस्ट्रेलियाची विस्फोटक फलंदाज ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) आहे. ताहलिया तिच्या १२ टी२० सामन्यांच्या छोट्याशा कारकिर्दीत धुव्वादार फलंदाजी करत कौतुकास पात्र ठरली आहे.
टी२० कारकिर्दीत फक्त २ वेळा बाद झालीय ताहलिया
ताहलियाने २०२१ मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तिने १२ टी२० सामने खेळले आहेत. या १२ टी२० सामन्यांमध्ये ती आतापर्यंत फक्त २ वेळा बाद झाली आहे. एकदा आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात ४५ चेंडूत ७० धावांची खेळी केल्यानंतर ती बाद झाली होती. तर दुसऱ्यांदा भारताच्या रेणुका सिंगने तिला पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. या सामन्यात ती फक्त १४ धावांवर त्रिफळाचीत झाली होती.
Tahlia McGrath cannot be stopped in Australian colours ????????
The best bits of her 78* against Pakistan at #B2022 ???? pic.twitter.com/HLrulzHL4F
— ICC (@ICC) August 4, 2022
याखेरीज ती इतर कोणत्याही टी२० सामन्यात बाद झालेली नाही. याच कारणामुळे तिची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील सरासरी १६९.५० इतकी आहे. तिने तिच्या १२ सामन्यांच्या टी२० कारकिर्दीत १५६.२२ च्या स्ट्राईक रेटने ३३९ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये तिची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी नाबाद ९१ धावा इतकी आहे.
पाकिस्तानी गोलंदाजाची केली चांगलीच धुलाई
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांचा शेवटचा साखळी फेरी सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ताहलियाने नाबाद ७८ धावा फटकावल्या होत्या. ५१ चेंडूत १ षटकार आणि १० चौकार ठोकत तिने ही झंझावाती खेळी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘केएल राहुलसाठी सोपे नसेल पुनरागमन!’, माजी दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न
टीम इंडियात होणार नेतृत्वबदल? हार्दिकच्या खांद्यावर येणार मोठी जबाबदारी
सूर्यकुमारवरून आपापसांत भिडले २ भारतीय दिग्गज; श्रीकांत कैफला म्हणाले, तू असं केलं असता का?





