इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा काही दिवसातच सुरू होणार आहे. ९ एप्रिल पासून या स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हटले जाते. या स्पर्धेत खेळणारा खेळाडू रातोरात श्रीमंत होत असतो. तसेच अनेक युवा खेळाडूंवर कोटी रुपयांची बोली लावत त्यांना आपल्या संघात स्थान दिले जाते. यात असेही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलच्या पहिल्या हंगामात लाखो रुपयांची बोली लावत संघात स्थान देण्यात आले होते. आता त्याच खेळाडूंना प्रत्येक हंगामात कोटी रुपयांचे मानधन दिले जात आहे.
१) विराट कोहली : भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली याने गेल्या काही वर्षात फलंदाजीमध्ये अनेक उच्चांक गाठले आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने विराट कोहलीला १२ लाख खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून तो याच संघात खेळत आहे. त्याने १३ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आता तो या संघाचा कर्णधार आहे. त्याला प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून १७ कोटी इतके मानधन दिले जाते.
२) एमएस धोनी : चेन्नई सुपर किंग्ज संघाला ३ वेळेस आयपीएल जेतेपद मिळवून देणारा कर्णधार, एमएस धोनी याला २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तो या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याला प्रत्येक हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून १५ कोटी इतके मानधन दिले जाते.
३) रोहित शर्मा : मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स संघाकडून केली होती.२ ००८ मध्ये झालेल्या लिलावात रोहितला डेक्कन चार्जर्स संघाने ३ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आले होते. २०११ मध्ये त्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आले. ५ वेळेस जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितला मुंबई इंडियन्स संघातर्फे प्रत्येक हंगामात १५ कोटी इतके मानधन दिले जाते.
४) हार्दिक पंड्या : मुंबई इंडियन्स संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावनारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याचे २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघात आगमन झाले होते. २०१५ मध्ये झालेल्या लिलावात हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघाने १० लाख रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. आता त्याला प्रत्येक हंगामात ११ कोटी इतके मानधन दिले जाते.
५) एबी डिविलियर्स : दक्षिण आफ्रिकन संघाचा आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्स याला आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली संघाने १.२ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्याला रिलीज केले होते.तेव्हापासून तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत खेळत आहे. आता त्याला प्रत्येक हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून ११ कोटी इतके मानधन दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ लिलावात मिळाला नाही खरेदीदार, मग ‘या’ भारतीय शिलेदारांनी क्रिकेटला ठोकला रामराम
दस्तुरखुद्द आनंद महिंद्रा यांच महागडं गिफ्ट वॉशिंग्टनच्या दारात उभं, सुंदरने ‘असे’ मानले आभार