मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीची’ बुधवारी (१८ जुलै) घोषणा केली होती.
या अकादमीत ९ ते १४ वर्ष वयोगटातील भारतीय आणि इंग्लंडमधील क्रिकेटपटूनां प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
सचिनने ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीची’ घोषणा केल्यानंतर, ही अकादमी इंग्लंडमध्ये का सुरु केली यावरुन अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. याबाबत सचिनने एका कार्यक्रमात नुकताच खुलासा केला.
“मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना, जेव्हा इंग्लंडमध्ये असायचो त्यावेळी मि़डलसेक्स क्रिकेट क्लबच्या मैदानावर सराव करायचो. तेथील क्रिकेट सुविधा सर्वोत्तम आहेत. ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीच्या’ भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लडमध्ये खेळण्याची संधी आणि अनुभव मिळावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच या अकादमीत प्रतिभावान आणि गरजू क्रिकेटपटूंना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ” असे मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला.
‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीचे’ पहिले सराव शिबीर नार्थवुडच्या मर्चंट टेलर्स स्कूलमध्ये ६ ते ९ ऑगस्ट या दरम्यान पार पडणार आहे.
त्यानंतर या अकादमीचे सराव शिबीर नोव्हेंबरमध्ये मुंबई आणि लंडन येथे पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनीचा बाथरुममधील हा व्हिडिओ होतोय वायरल!
–इंग्लंडला पराभूत करण्यासाठी आर. अश्विन आतुर
-अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर