आगामी १९ वर्षांखालील विश्वचषक (u19 world cup 2021) पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने १४ डिसेंबरला त्यांच्या (australia u19 team) संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाने यापूर्वी २०१० मध्ये विश्वचषक जिंकला होता. आता यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघात काही गुणवंत खेळाडूंचा समावेश आहे आणि त्यांचा संघ पुन्हा एकदा विश्वचषकाची ट्रॉफी जिंकण्याच्या तयारीत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियन संघात भारतीय वंशाचा एक अप्रतिम गोलंदाज देखील सामील आहे.
ऑस्ट्रेलियाने आगामी १९ वर्षाखालील संघात निवडलेल्या खेळाडूंमध्ये निवेथन राधाकृष्णन याचा देखील समावेश आहे. राधाकृष्णन मुळचा भारतीय वंशाचा आहे. त्याचा जन्म भारताच्या तामिळनाडू राज्यात झाला आहे. नंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला आणि सध्या त्यांच्या १९ वर्षाखालील संघाचा भाग आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये जाण्यापूर्वी तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला होता. तसेच इतर तामिळनाडूतील इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतला आहे.
एवढेच नाही, तर आयपीएलच्या २०२१ हंगामात देखील राधाकृष्णनने नेट गोलंदाजाची भूमिका पार पाडली आहे. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा नेट गोलंदाज होता. त्याच्याकडे गोलंदाजीची एक अजब शैली आहे, ती म्हणजे तो त्याच्या दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. तो शक्यतो जेव्हा समोर डावखुरा फलंदाज असेल, तेव्हा ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. तर जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज समोर असतो, तेव्हा तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याच्या या गोलंदाजीमुळे विरोधी संघाच्या फलंदाजासमोर नक्कीच अडचणी निर्माण होतात.
यावर्षाच्या सुरुवातीला त्याने एका क्रिकेट संकेतस्थळाशी त्याच्या अजब गोलंदाजीसंदर्भात चर्चा गेली होती. तो यावेळी म्हणाला होता की, चेन्नईमध्ये टीवीवर किंवा लीग क्रिकेटमध्ये दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कोणीच नव्हता. तेव्हा कोणीच याविषयी ऐकले नव्हते. त्यावेळी मी हा विचार केला की, मीच याची सुरुवात का करू नये ? माझ्या मनात अपयशाची कसलीच भीती नव्हती.
महत्वाच्या बातम्या –
विराट-रोहित वादावर गावसकरांची समंजस प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दोघे…”
‘या’ व्यक्तीच्या हट्टामुळे चार वर्षानंतर अश्विनला दिली गेली विश्वचषकात संधी
फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू