आयपीएलच्या धर्तीवर देशातील विविध राज्यांमध्ये टी20 स्पर्धा सुरु झाल्या आहेत. यापैकीच एक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे तामिळनाडू प्रीमियर लीग अर्थातच TNPL. या टीएनपीएलच्या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली, जी आता चर्चेचा विषय बनली आहे.
सध्या टीएनपीएलचे सामने डिंडीगुल येथील एनपीआर कॉलेज मैदानावर खेळले जात आहेत. या मैदानाला लागून शेतजमिनी आहेत. स्पर्धेचा 27वा सामना सीचेम मदुराई पँथर्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात खेळला जात होता. या सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. झालं असं की, सामन्यात एका फलंदाजानं उत्तुंग षटकार मारला, ज्यानंतर चेंडू सरळ मैदानाबाहेर जाऊन पडला. मैदानाला लागून शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. तेथे एक शेतकरी काम करत होता.
जसा चेंडू या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पडला, त्यानं तो उचलला आणि हातांनी इशारा केला की तो हा चेंडू वापस करणार नाही. यानंतर तो चेंडू घेऊन तेथून निघून गेला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
A must watch moment in TNPL. 😀👌
– Peak gully cricket vibe when an outsider took the ball & not giving it back…!!! pic.twitter.com/N5iah4NmUT
— Johns. (@CricCrazyJohns) July 29, 2024
सीचेम मदुराई पँथर्स विरुद्ध चेपॉक सुपर गिलीज सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मदुराई संघानं हा सामना 9 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मदुराई पँथर्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 4 गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना चेपॉक सुपर गिल्लीजचा संघ 8 गडी गमावून 182 धावाच करू शकला. मदुराईचा यष्टीरक्षक फलंदाज सुरेश लोकेश्वरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, ज्यानं 40 चेंडूत 55 धावा केल्या.
हेही वाचा –
तिसऱ्या टी20 सामन्यातही पाऊस खोळंबा घालणार? जाणून घ्या पल्लेकेलेच्या हवामानाची स्थिती
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्रानं रचला इतिहास, यजमान फ्रान्सच्या खेळाडूला हरवून केला मोठा उलटफेर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोरोना व्हायरसची एंट्री, पदक जिंकल्यानंतर खेळाडू आढळला कोविड पॉझिटिव्ह