पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रन हिने कर्नाटकाच्या कीर्थना पंडियनचा पराभव करून विजेतेपद पटकावत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान पटकावला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर बिलियर्ड्स मुलींच्या गटात अंतिम फेरीत गतविजेत्या तामिळनाडूच्या 17वर्षीय अनुपमा रामचंद्रन हिने कर्नाटकाच्या कीर्थना पंडियनचा 147-83 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
अनुपमा हि चेन्नई येथे टीएनबीएसए आणि मायलापोर क्लब येथे प्रशिक्षक एसए सलीम यांच्या मार्गदर्शनखाली सराव करते. विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना अनुपमा म्हणाली कि, माझे हे सब-ज्युनियर बिलियर्ड्समधील सलग दुसरे विजेतेपद आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मी प्रत्येक सामन्यात लक्षपूर्वक खेळ केला. स्पर्धेत माझ्या कामगिरीत मला सातत्य राखता आले व त्यामुळेच विजेतेपदावर पुन्हा एकदा आपले नाव करू शकले.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत अनुपमा रामचंद्रन हिने मध्यप्रदेशच्या कनिशा जूरानीचा 215(34)-75 असा तर, कर्नाटकाच्या कीर्थना पंडियन हिने मध्यप्रदेशच्या सान्वी शहाचा 186-95 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत मध्यप्रदेशच्या सान्वी शहा हिने आपलीच राज्य सहकारी कनिशा जूरानीचा 104(17)-85 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
सब-ज्युनियर मुलींच्या स्नूकर गटात बाद फेरीत तामिळनाडूच्या साफिलो सारा बेनी हिने कर्नाटकच्या मोक्षा एल.एसचा 2-0(53-11, 44-23) असा तर, तामिळनाडूच्या सेनेथरा बाबू हिने मध्यप्रदेशच्या प्रिया चोक्सीचा 2-0(50-35, 50-21) असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
सब-ज्युनियर मुली बिलियर्ड्स।
उपांत्य फेरी।
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.कनिशा जूरानी(मध्यप्रदेश)215(34)-75;
कीर्थना पंडियन(कर्नाटक)वि.वि.सान्वी शहा(मध्यप्रदेश)186-95;
अंतिम फेरी।
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि. कीर्थना पंडियन(कर्नाटक)147-83;
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी: सान्वी शहा(मध्यप्रदेश)वि.वि.कनिशा झुरानी(मध्यप्रदेश)104(17)-85;
सब-ज्युनियर मुली स्नूकर।
बाद फेरी।
साफिलो सारा बेनी(तामिळनाडू)वि.वि.मोक्षा एल.एस(कर्नाटक)2-0(53-11, 44-23);
आन्या पटेल(गुजरात)वि.वि.कनिशा जूरानी(मध्यप्रदेश)2-1(67-32, 30-47, 51-35);
अनुपमा रामचंद्रन(तामिळनाडू)वि.वि.सौम्या सिंग(मध्यप्रदेश)2-0(65-28, 64-16);
सान्वी शहा(मध्यप्रदेश)वि.वि.तन्वीर गौहर(मध्यप्रदेश)2-0(58-40, 58-17);
अनिता बिजू(केरळ)वि.वि.हाजरा फारुखी(मध्यप्रदेश)2-0(39-15, 50-42);
मोहिता आरआय(तामिळनाडू)वि.वि.श्रेया दुबे(मध्यप्रदेश)2-0(56-30, 57-02);
सेनेथरा बाबू(तामिळनाडू)वि.वि.प्रिया चोक्सी(मध्यप्रदेश)2-0(50-35, 50-21);
वरिष्ठ स्नूकर मुले।
डबल एलिमनेशन फेरी।
गट अ: प्रवेश जैदका(चंदीगड)वि.वि.दिव्या ज्योती(झारखंड)3-0(78-54, 55-34, 58-28);
गट अ: त्रिदिब डेका(आसाम)वि.वि.भारत सीव्ही(कर्नाटक)3-1(71-20, 02-60, 68-28, 60-35);
गट अ: हरप्रीत सिंग(दिल्ली)वि.वि.प्रियांक जैस्वाल(मध्यप्रदेश)3-1(113(113)-09, 60-67, 67-60, 67-41);
गट अ: नरेश कुमार(तेलंगणा)वि.वि.डी. गंगाधर(आंध्रप्रदेश)3-2(50-59, 64-19, 49-63, 64-47, 65-58);
गट ब: के. श्रीनु(आरएसपीबी)वि.वि.आर.लोंगनाथन(तामिळनाडू)3-0(60-28, 58-29, 83(56)-18);
गट ब: सरफराज एसके(पश्चिम बंगाल)वि.वि.तुषार श्रेष्ठा(बिहार)3-1(41-43, 72-36, 69(56)-01, 80-32;
गट ब: स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.रुचिर मसंद(मध्यप्रदेश)3-1(66-29, 73-22, 53-61, 62-25);
गट क: पियुष खुशवा(मध्यप्रदेश)वि.वि.राजीव शर्मा(महाराष्ट्र)3-2(68-22, 95(64)-15, 39-74, 16-58, 74-08);
गट फ: सिद्धार्थ पारीख(महाराष्ट्र)वि.वि.सलील देशपांडे(महाराष्ट्र)3-0(65-22, 76-07, 67-33).