सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील पहिला उपांत्य फेरी सामना शुक्रवारी (२९ फेब्रुवारी) तमिळनाडू विरुद्ध राजस्थान संघात पार पडला. या महत्त्वपुर्ण सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात तमिळनाडूने १८.४ षटकात ३ विकेट्स गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. तमिळनाडूच्या विजयाचा नायक ठरला, ‘अरुण कार्तिक’.
अरुण कार्तिकची जबरदस्त खेळी
राजस्थानच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तमिळनाडूची सुरुवात वाईट झाली. त्यांचा सलामीवीर हरी निशांत पावरप्ले संपायच्या आतच स्वस्तात बाद झाला. पुढे बाबा अपराजितही अवघ्या २ धावांवर पव्हेलियनला परतला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अरुण कार्तिकने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याने १६४.८१ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ८९ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने अवघे ५४ चेंडू खेळले. दरम्यान ३ षटकार आणि ९ चौकार मारले.
एवढेच नव्हे तर, सलामीवीर एन जगदीशन बाद झाल्यानंतर संघ कर्णधार दिनेश कार्तिकसोबत मिळून त्याने ८९ धावांची नाबाद भागिदारी साकारली. यात दिनेश कार्तिकच्या नाबाद २६ धावांचा समावेश होता. अरुण कार्तिकच्या या जबरदस्त खेळीमुळे तमिळनाडूने अंतिम सामन्यात धडक मारली.
७ वर्षांपासून नाही खेळले आयपीएल
महत्त्वाचे म्हणजे, अरुण कार्तिक हा जगप्रसिद्ध टी२० लीग म्हणजेच आयपीएलचाही भाग आहे. परंतु गेल्या ७ वर्षांपासून त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. त्यानंतर आयपीएल २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून त्याने शेवटचा सामना खेळला. दरम्यान १७ सामन्यातील ८ डावात फलंदाजी करताना त्याने ५१ धावा केल्या होत्या.
Tamil Nadu march into the final! 👍👍
The @DineshKarthik-led unit beat Rajasthan by 7⃣ wickets to seal a place in the summit clash. 👏👏 #TNvRAJ #SyedMushtaqAliT20 #SF1 | @TNCACricket
Scorecard 👉 https://t.co/Y5DkQ6696D pic.twitter.com/XSDihUgY3E
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
असे असले तरी, सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीतील धडाकेबाज प्रदर्शनासह त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे सर्वांना अपेक्षा आहे की, आयपीएल २०२१ मध्ये कोणता-ना-कोणता संघ अरुण कार्तिकसाठी बोली लावेल आणि त्याचे आयपीएलमध्ये पुनरागमन होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा ‘विराट’ विक्रम मोडण्याची कोहलीला संधी, इंग्लंडविरुद्ध करावा लागेल ‘हा’ कारनामा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : पंजाबला पराभूत करत बडोद्याची अंतिम फेरीत धडक