तामिळनाडू आणि बांगलादेश इलेवन या संघामध्ये चार सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (दि. 8 नोव्हेंबर) खेळला गेला. या सामन्यात तामिळनाडूनेे व्हीजेडी पद्धतीच्या सहाय्याने बांगलादेश इलेवन संघाचा 58 धावांनी पराभव केला. तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करत 47 षटकात 306 धावा केलेल्या. त्यानंतर कमी प्रकाशामुळे बांगलादेश इलेवन संघाला 310 धावांचे नविन लक्ष्य मिळाले. बांगलादेश इलेवन संघाला 40 षटकात 194 धावा करता आल्या. खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्याता आला. हा खेळ पुन्हा चालू होऊ शकला नाही. त्यावेळी बांगलादेश व्हीजेडी धावसंख्येपेक्षा 58 धावांनी मागे होता.
तामिळनाडू आणि बांगलादेश इलेवन या संघांमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी खेळवण्यात आला. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या तामिळनाडूला पहिला धक्का एन जगदीसन याच्या रुपात 28 धावसंख्येवर लागला. तो केवळ 18 धावा करत बाद झाला. दुसरा सलामीवीर सूर्यप्रकाश याने 44 चेंडूत 42 धावा केल्या. त्यानंतर आलेला बाबा इंद्रजीत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत होता.मात्र, तोही वैयक्तिक 20 धावांंवर बाद झाला. साई सुदर्शन यानेही 40 धावा केल्या. काही गडी बाद झाल्यानंतर शाहरुख खान याने संजय यादव याच्यासोबत धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले. या दोघांनीही संघाची धावसंख्या 181 पासून 249 पर्यंत नेली. शाहरुखने वादळी खेळाचे प्रदर्शन करत 69 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. अशा पद्धतीने तामिळनाडू संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर महमुदूल हसन रॉय याला भोपळाही फोडता आला नाही. सैफ हसन आणि अनामुल हक अनुक्रमे 30 आणि 24 धावा करत बाद झाले. त्यानंतर आलेला मोमिनूल हक अवघ्या 6 धावा करत संजय यादव याच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार मोहम्मद मिथून याचा देखील फ्लॉप शो झाला आणि केवळ 1 धाव करत बाद झाला. खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. मात्र, संघाला विजयापर्यंत पोहचवू शकले नाही. 40व्या षटकात 194 धावा झालेल्या असताना खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. निर्धारीत धावसंख्येपेक्षा 58 धावांनी मागे असल्याने त्यांचा पराभव झाला. तामिळनाडू संघासाठी रघूपती सिलाम्बारासन याने दोन गडी बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापती इंग्लंडचा पिच्छा सोडेना! मलानपाठोपाठ ‘हा’ वेगवान गोलंदाजही झाला जखमी, भारताचे टेन्शन मिटले
मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ