बांगलादेशचेे खेळाडूंचे मैदानावर नियंत्रण लगेच सुटते. या गोष्टीचे ताजे उदाहरण आता तमिम इकबाल यानेे दिलेे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या एका सामन्यात तमिम इकबाल चक्क पंचांवरतीच भडकला आणि भर मैदानात हुज्जत घालू लागला. या सामन्यात पंचांनी त्याला बाद घोषीत केले होते ज्यावर हा बांगलादेशी फलंदाज बराच नाराज झाला आणि भरमैदानात पंचांशी वाद घालू लागला. या घटनेची व्हिडीओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Poor umpiring continues in Bangladesh Cricket League matches. #TamimIqbal is very shocked & unhappy with the decision of umpire.#NZvIND #AUSvsENG#AUSvENG #INDvsNZ pic.twitter.com/YIeBBc3rWM
— Abdullah Neaz 🇧🇩 (@Neaz__Abdullah) November 22, 2022
बांगलादेश क्रिकेट लीग 2022 मध्ये इस्लामी बॅंक आणि नॉर्थ झोन या संघांमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात तमिम इकबाल (Tamim Iqbal) इस्लामी बॅंक या संघाकडून फलंदाजी करत होता. यातच रिपन मंडल (Ripon Mandal) हा गोलंदाजीसाठी आला. या षटकात त्याचा एक आखूड टप्प्याचा चेंडू आदळून बाहेरच्या दिशेने वळाला.या चेंडूवर फटका मारण्यात तमिम अपयशी राहीला. यावर गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने जोरदार अपील केली आणि पंचांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला बाद घोषीत केले. पंचांनी दिलेला निर्णय मान्य नसल्याने तमिमच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तंबूत जाताना पंचांशी वाद घालू लागला.
एवढेच नाही तर थर्ड अंपायरने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा राग शांत होण्याची काहीही चिन्हे दिसत नव्हती. बरीच खडाजंगी झाल्यानंतर शेवटी तमिमला पंचाचा निर्णय मान्य करावा लागला आणि आल्या पावलाने मागेे जावेे लागले. तमिम केवळ 7 धावा करुन बाद झाला.
22 नोव्हेंबरला खेळल्या गेलेल्या या सामन्याविषयी बोलायचे झाले तर, नॉर्थ झाेनने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत 50 षटकात 8 गडी गमावत 216 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इस्लामी बॅंक संघ 44.3 षटकात 155 धावांवर सर्वबाद झाला आणि नॉर्थ झोन संघ 61 धावांनी जिंकला.(Tamim Iqbal resisted the decision of giving giving out by umpire)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याची बॅटिंग पाहून मी लगेच फिंचला मेसेज केला आणि म्हटलं…’, सूर्याच्या शतकावर मॅक्सवेलची प्रतिक्रिया
‘तो तितका भारी गोलंदाज नाही’; शानदार कामगिरी केलेल्या सिराजबद्दल भारतीय दिग्गजाचे वक्तव्य