पुणे। एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए-नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12वर्षाखालील (7दिवसीय) टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात वीरा हरपुडे, श्रावि देवरे, शिबानी गुप्ते यांनी तर, मुलांच्या गटात तनिष्क देवरे, सुजय देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
नवसह्याद्री क्रीडा संकुल येथील टेनिस कोर्टवर सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत वीरा हरपुडे हिने चौथ्या मानांकित कीर्तीयानी घाटकरचा 6-3, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. पुण्याच्या श्रावि देवरेने आपली शहर सहकारी पाचव्या मानांकित अनुष्का जोगळेकरला 6-1, 6-0 असे पराभूत केले. शिबानी गुप्ते हिने सहाव्या मानांकित ऐश्वर्या स्वामीनाथनचे आव्हान 7-5, 6-1 असे मोडीत काढले.तिसऱ्या मानांकित तमन्ना नायरने सान्वी राजूचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
मुलांच्या गटात तनिष्क देवरे याने दुसऱ्या मानांकित वीरेन चौधरीचा 6-1, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या बिगरमानांकीत सुजय देशमुख याने सातव्या मानांकित विश्वास चंद्रसेकरनला 6-2, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित ऋषिकेश मानेने सय्यम पाटीलला 6-0, 6-3 असे नमविले. अव्वल मानांकित आरव पटेलने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत क्वालिफायर अनिश वडनेरकरचा 6-3, 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरी फेरी): 12 वर्षांखालील मुले:
आरव पटेल(महाराष्ट्र)(1) वि.वि.अनिश वडनेरकर(महाराष्ट्र)6-3, 6-1;
तनिष्क देवरे(महाराष्ट्र)वि.वि.वीरेन चौधरी(महाराष्ट्र)(2) 6-1, 6-2;
ऋषिकेश माने(महाराष्ट्र)(5)वि.वि.सय्यम पाटील(महाराष्ट्र)6-0, 6-3;
आर्यन किर्तने(महाराष्ट्र)वि.वि.अंशुल पुजारी(महाराष्ट्र)6-2, 6-3;
सुजय देशमुख(महाराष्ट्र)वि.वि.विश्वास चंद्रसेकरन(महाराष्ट्र)(7)6-2, 6-2;
राम मगदूम(महाराष्ट्र)(8) वि.वि.आरव छल्लाणी(महाराष्ट्र)6-0, 6-2;
सर्वज्ञ सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.युगंधर शास्त्री(महाराष्ट्र)6-4, 6-4;
राघव सरोदे(महाराष्ट्र)वि.वि.नमिश हूड(महाराष्ट्र)6-4, 6-3;
12वर्षांखालील मुली:
रित्सा कोंडकर(महाराष्ट्र)वि.वि.ओजसी देगमवार(महाराष्ट्र)6-3, 6-0;
काव्या पांडे(महाराष्ट्र)वि.वि.सारा फेंगसे(महाराष्ट्र)6-1, 6-2;
तमन्ना नायर(महाराष्ट्र)(3)वि.वि.सान्वी राजू(महाराष्ट्र)6-2, 6-3;
वीरा हरपुडे(महाराष्ट्र)वि.वि.कीर्तीयानी घाटकर(महाराष्ट्र)(4) 6-3, 6-1;
श्रावि देवरे(महाराष्ट्र)वि.वि.अनुष्का जोगळेकर(महाराष्ट्र)(5) 6-1, 6-0;
शिबानी गुप्ते(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्या स्वामीनाथन(महाराष्ट्र)(6) 7-5, 6-1;
काव्या तुपे(महाराष्ट्र)(7)वि.वि.प्रांजली पांडुरे(महाराष्ट्र)6-1, 6-1;
रिशीता पाटील(महाराष्ट्र)(8) वि.वि.अन्विता खांडेकर(महाराष्ट्र)6-0, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –