भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर टीम इंडियामधील एक स्थान रिक्त झालं होतं. आता अश्विनच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला संधी मिळाली आहे.
‘स्पोर्टस्टार न्यूज’नुसार, बीसीसीआयनं बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी अष्टपैलू तनुश कोटियनची संघात निवड केली आहे. तनुश हा फिरकी गोलंदाज आहे जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळतो. तनुशनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्यानं या फॉरमॅटमध्ये शटक देखील ठोकलं आहे. तनुशनं लिस्ट ए सामन्यांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. तथापि, बीसीसीआयनं अद्याप त्याच्या संघात सामील होण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
तनुशच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 101 बळी घेतले जातात. 58/5 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. या फॉरमॅटच्या 47 डावांमध्ये तनुशनं 1525 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावे 2 शतकं आणि 13 अर्धशतकं आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर 120 आहे. याशिवाय तनुशनं लिस्ट ए च्या 20 सामन्यांमध्ये 20 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. या मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. भारतानं पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसरी कसोटी 10 गडी राखून जिंकत जोरदार कमबॅक केलं. गाबा मैदानावरील तिसरी कसोटी ड्रॉ राहिली. आता चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळली जाणार आहे.
हेही वाचा –
चाहत्यांचा हर्टब्रेक! मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयनं जारी केलं महत्त्वाचं अपडेट
कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईची लाज राखली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघासाठी ठोकला दावा!
16 चौकार, 11 षटकार…विजय हजारे ट्रॉफीमध्ये ‘ऋतु’चा राज! 200च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं शतक