---Advertisement---

कर्णधार झाल्या झाल्या बाबर आझमची या खेळाडूने काढली अब्रू

---Advertisement---

पाकिस्तान वनडे संघाचा नवीन कर्णधार बाबर आझमला आपल्या संघाचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमदकडून सल्ला मिळाला आहे. अहमदने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, बाबरला आपल्या इंग्रजी भाषेमध्ये सुधारणा केली पाहिजे. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

अहमदने (Tanveer Ahmed) बाबरला आपल्या ड्रेसिंग सेन्समध्ये बदल करण्याचाही सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, “बाबरला (Babar Azam) आता माध्यमांशी चर्चा करावी लागेल आणि अशामध्ये त्याने आपल्या इंग्रजी भाषेवर काम केले पाहिजे.”

https://twitter.com/Saj_PakPassion/status/1262049191079153677

तन्वीर म्हणाला की, “कर्णधाराला नाणेफेकीसाठी जावे लागते. सामन्यानंतर माध्यमांशी चर्चाही करावी लागते. समालोचकाशी चर्चा करावी लागते. कर्णधार चांगल्या प्रकारे चालत असतो. जेवण चांगल्या प्रकारे करत असतो. चांगले कपडेदेखील घालत असतो.”

“जेव्हा या सर्व गोष्टी कर्णधार करतो, तेव्हा इतर खेळाडूदेखील कर्णधाराचे अनुकरण करतात. तसेच जेव्हा इतर खेळाडू गोष्टी व्यवस्थित करत नसतात, तेव्हा कर्णधार सर्वजणांना म्हणू शकतो की, मी करत आहे तर तुम्ही का नाही करत,” असेही तो पुढे म्हणाला.

अहमद म्हणाला की, “कर्णधार सर्व गोष्टींमध्ये अव्वल असतो. तसेच त्याला ड्रेसिंग सेन्समध्येही (Dressing Sense) सर्वोत्तम असावे लागते. नेतृत्व करणे सोपे नाही, तर खूप कठीण आहे.”

सोशल मीडियावर अहमदचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अहमदला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. बाबरच्या चाहत्यांचे असे मत आहे की, त्याने अशाप्रकारच्या मूर्ख गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही. त्याने केवळ आपल्या फीटनेस आणि धावा करण्याबद्दल विचार केला पाहिजे.

बाबरने २०१६मध्ये कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये ५ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ७४ वनडे सामने खेळताना त्याने ११ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत.

याव्यतिरिक्त बाबरची तुलना नेहमी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) केली जाते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-पाकिस्तानला २वेळा विकले तरीही नाही देता येणार आमिर खानची अर्धी फीदेखील

-५ असे क्रिकेटर ज्यांचे संघातच होते मोठे दुश्मन, दोन जोड्या आहेत भारतीय

-टीमचा कोच म्हणतोय, तुझी आता टीममध्ये जागा नाही

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---