---Advertisement---

भारतीय मूळ असलेल्या ‘या’ पठ्ठ्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड, वडिल चालवायचे टॅक्सी; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

On: मंगळवार, मे 18, 2021 7:22 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने ९ जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी२० आणि ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी २३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा फिरकीपटू तनवीर संघा याची निवड करण्यात आली आहे. यासह तनवीर हा ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात निवड होणारा दुसरा भारतीय मूळ असलेला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापुर्वी २०१५ मध्ये भारतीय मूळ असलेला गुंरेद्र संधू याला पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया संघात सहभागी करण्यात आले होते.

तनवीर लहानपणी खेळत असायचा रेसलिंग
१९ वर्षीय तनवीर हा मूळचा भारतातील पंजाब राज्यामधील जलंधर शहराचा रहिवासी आहे. त्याचे वडील जोगा संघा हे १९९७ मध्ये जलंधर शहारापासून २० किलोमीटर दूर असलेल्या रहीमपूर कला संघियन गावातून कामासाठी सिडनीच्या दक्षिण पश्चिम उपनगरमध्ये गेले होते. सिडनीमध्ये ते टॅक्सी ड्राइव्हरचे काम करत असत. तत्पुर्वी ब्रिस्बेन येथे एका ठिकाणी ते मजूरीचे काम करत असत.

जोगा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “मी कधीही भारतात क्रिकेट पाहिले नव्हते. मी नेहमी कबड्डी, व्हॉलीबॉल आणि रेसलिंग हे खेळ खेळत असायचो. ऑस्ट्रेलियामध्ये हिवाळ्यात रेसलिंगच्या स्पर्धा होत असतात आणि बऱ्याचदा तनवीरसुद्धा माझ्यासोबत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येत असायचा. तो रेसलिंगच्या ज्यूनीयर बाउट्समध्ये खेळायचा.”

“तनवीर जेव्हा १० वर्षांचा होता. तेव्हा आम्ही इंग्लेबर्न आरएसएल क्रिकेट क्लबमध्ये त्याला दाखल केले होते. त्यावेळी मीच त्याला क्लबपर्यंत सोडण्यासाठी आणि घेऊन येण्यासाठी जात असायचो. यामुळे बऱ्याचदा माझ्या कामाकडे दुर्लक्ष व्हायचे. त्यासाठी मी सकाळी लवकर किंवा रात्री उशीरापर्यंत काम करत असायचो”, असे त्यांनी पुढे सांगितले होते.

बिग बॅश लीगमध्ये केली प्रभावी कामगिरी 
तनवीर सध्या ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध बिग बॅश लीगमधील सिडनी थंडर संघाचा भाग आहे. शानदार कामगिरी करत फार कमी वेळेत या फिरकीपटूने सर्वांना आपल्यातील प्रतिभा दाखवून दिली आहे. आतापर्यंत बिग बॅश लीगमध्ये त्याने एकूण १४ सामने खेळले असून २१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला कामगिरीला पाहता चाहते त्याला ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याचा उत्तराधिकारी असे संबोधतात.

१९ वर्षांखालील विश्वचषकातही पाडली छाप  
युवा गोलंदाज तनवीरची तेव्हा जास्त चर्चा झाली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू फवाद अहमद यांची त्याच्यावर नजर पडली होती. तनवीरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाजीपासून केली होती. मात्र जस-जसा तो मोठा होत गेला तस-तशी त्याने फिरकी गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.

सिडनी क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळताना त्याने दमदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे लवकरच त्याला आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यावेळी तो १९ वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाकडून ६ सामन्यात १५ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान १४ धावांवर ५ विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी त्याने केली होती.

वेस्ट इंडिज विरुद्धचा ऑस्ट्रेलिया संघ –
ऍरॉन फिंच (कर्णधार), एश्टन अगर, जैसन बेहरेनड्रॉफ, एलेक्स कैरी, पैट कमिंस, जोश हैजलवुड,  केन रिचर्डसन, तनवीर संघा, डार्शी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोइनिस, मिचेल स्वीपसन, एंड्रयू टाई, मैथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जंपा, मोइसेस  हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, रिले मेरेडिथ, जोश फिलिप और जाय रिचर्डसन.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाला मिळाले दोन नवे प्रशिक्षक, एक आहे माजी सलामीवीर

कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे खुशखबर

आयपीएलमध्ये भावासमोर गोलंदाजी करताना सॅम करनची ‘अशी’ झाली होती अवस्था, स्वतः केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---