महिला हॉकीपाठोपाठ आता तिरंदाजीतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सहाव्या दिवशी (२८ जुलै) पुरुषांच्या वैयक्तिक तिरंदाजीच्या दुसऱ्या फेरीच्या राऊंड ३२ मधून तरुणदीप राय बाहेर पडला आहे. इस्रायलच्या इताय शॅनीने तरुणदीपला ६-५ ने पराभूत केले. विशेष म्हणजे सकाळी झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात तरुणदीपने विजय मिळवला होता. मात्र, तो आपल्या कामगिरीत सातत्य ठेवू शकला नाही आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
तिरंदीजत तरुणदीपचा प्रवास संपला आहे. पहिल्या सेटमध्ये तरुणदीपने केवळ २४ गुण मिळवले होते, तर २८ गुणांसह शॅनीने हा सेट जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तरुणदीपने २७ गुण आणि शॅनीने २६ गुण मिळवले होते. त्यामुळे सामन्यात बरोबरी साधली गेली होती. तिसऱ्या सेटमध्ये दोघांनीही २७-२७ गुण मिळवल्याने बरोबरी झाली. पुढे चौथ्या सेटमध्ये तरुणदीपने २८ गुण मिळवले, तर शॅनी केवळ २७ गुण मिळवू शकला होता. (Tarundeep Rai Lose Against Itay Shanny In Individual Mens Archery)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/16 Eliminations Results@tarundeepraii bows out in the 2nd Round as he misses out by a single point in the shoot-off against Itay Shanny of Israel. Great effort Champ! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/t1ZFkbZiUf— Team India (@WeAreTeamIndia) July 28, 2021
चौथा हा सेट तरुणदीपने आपल्या नावावर केला. मात्र, पुढच्या राऊंडमध्ये त्याला शॅनीकडून पराभव पत्करावा लागला. पाचव्या सेटमध्ये तरुणदीपने २७ गुण मिळवले, तर शॅनीने २८ गुण मिळवले. शूटऑफमध्ये तरुणदीपने ९ गुण मिळवले, तर शॅनीने १० गुण मिळवत हा पुरुषांचा वैयक्तिक राऊंड आपल्या आपल्या खिशात घातला.






