झिम्बाब्वे विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये हरारे येथे एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी बांगलादेश संघाने सामन्यात आपली पकड बनवली होती. परंतु याच दिवशी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज मुजरबानी आणि बांगलादेश संघाचा फलंदाज तस्किन अहमद या दोघांनी मैदानावर असे काही कृत्य केले होते, ज्यामुळे आयसीसीने दोघांनाही शिक्षा दिली आहे.
या सामन्यातील दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांकडून उत्कृष्ट खेळ केल्याचे पाहायला मिळाले होते. महमद्दुलाहच्या शानदार दीडशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. मात्र, यादरम्यान झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी व बांगलादेशचा तस्किन अहमद मैदानावर आपापसात भिडताना दिसून आले होते. ज्यामुळे आयसीसीने दोन्ही खेळाडूंवर आचारसंहितेच्या लेव्हल वन (अनुचित शारीरिक संपर्क) च्या उल्लंघनासाठी सामना शुल्काच्या १५ टक्के दंड आकारला आहे.(Taskin Ahmed and muzarabani fined for breaching icc code of conduct)
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेचा कलम २.१.१२ चे उल्लंघन केल्याचे आढळले आले आहे. जे एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, पंच, सामना रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी (प्रेक्षकांसह) अनुचित शारीरिक संपर्काशी संबंधित आहे. तसेच दोन्ही खेळाडूंच्या शिस्तीच्या रेकॉर्डमध्ये एक डिमरेट पॉईंट देखील जोडला गेला आहे. गेल्या २४ महिन्यांत या दोघांपैकी एकही खेळाडू नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले नव्हते.
https://twitter.com/shihabahsankhan/status/1413043482877329409?s=20
तस्कीनच्या ब्रेक डान्सनंतर घडला हा प्रकार
ही घटना गुरुवारी, बांगलादेश संघाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू असताना ८५ व्या षटकांत घडली होती. तस्कीनने १३४ चेंडुंमध्ये ७५ धावांची खेळी केली होती. तस्कीन बाद होत नसल्याने मुजरबानी संतापलेला होता. अशातच ८५ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुजरबानीने शॉर्ट चेंडू टाकला होता, जो चेंडू तस्कीनने योग्यरीत्या सोडला होता. त्यानंतर तस्कीनने ब्रेक डान्स करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे गोलंदाजाचा पारा चढला होता. तस्कीनने या खेळी दरम्यान १३४ चेंडुंमध्ये ११ चौकारांच्या साहाय्याने ७५ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना इफेक्ट! भारत-श्रीलंका मालिकेच्या वेळपत्रकात बदल, १३ जुलै नव्हे ‘या’ दिवशी होणार सुरुवात
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा
हरलीन देओलने ‘सुपरवुमेन’ बनत बाउंड्रीजवळ टिपला अद्भुत झेल; चाहते म्हणाले, ‘हुबेहुब जडेजा’